हदगाव तालुक्यात मध्यराञी एस. टी . महामंडळाची नवीन बस जाळली …!

विदर्भ मराठवाडा या सिमेवर घडल्याने नेमकी हि घटना कुणाच्या हद्दीत घडली ह्याच शोध सुरु

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्याच्या विदर्भ सिमेवर असलेल्या गोजेगाव परिसरात तुळजापूर नागपुर या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यराञी 11-30 वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीनी बस जाळल्याची घटना घडली आहे. नांदेड आगाराची नवीन बस क्रमांक MH20-GC3189 नादेड -नागपूर [रातराणी] कोणी जाळली या बाबतीत प्रशासनाकडे अध्याप तरी माहीती उपलब्ध नाही. सदर घटना विदर्भ मराठवाडा या सिमेवर घडल्याने नेमकी हि घटना कुणाच्या हद्दीत घडली ह्याच शोध विदर्भाचे व मराठवाडाच्या पोलिस प्रशासनाकडून घेतला आत असल्याचे दिसुन येत आहे. अध्यापही या बाबतीत नेमकी घटना कुणाच्या हद्दीत घडली या घोळामुळे घटना कोणत्या कारणावरून झाली, कुणी केली, का केली याचे कारण अस्पष्ठ आहे… तर याबाबत कुणाला ही अटक अथवा कोणावरही गुन्हा नोंद करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे एस टी महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे.

घटना घडामोडी व इतर सविस्तर बातमीसाठी वाचत रहा… 

यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर 10 ते 12 अज्ञातांनी दुचाकीवर येऊन एसटी बस पेटवल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री ही घटना घडली. या बसमध्ये 72 प्रवासी होते. या प्रवाशांना खाली उतरवून अज्ञातांनी बस पेटवली. ही बस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याहून नागपूरकडे जात होती. आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे. विदर्भ- मराठवाडा सीमेवर उमरखेडजवळील पैनगंगा नदीच्या पुलावर हा प्रकार घडला. बस नेमकी का पेटवली, अज्ञात कोण होते? याबाबत अजून माहिती समोर येऊ शकली नाही. रात्री घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.

दरम्यान, राज्यभरात मराठा आरक्षणावरुन मराठा समाज आक्रमक झालेला असताना ही बस पेटवण्यामागेही मराठा आंदोलकांचा हाथ असावा, अशी चर्चा सुरु आहे. कारण ही बस ज्या हदगाव तालुक्याहून निघाली होती तिथेही मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगेना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण केल जात आहे तसेच, राजकीय नेत्यांनाही गावात बंदी ्आहे. मात्र, गाडी पेटवणारे 10 ते 12 जण कोण होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे घटनेचा तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत माहिती देता येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!