लोहा/नांदेड। राज्यातील शिंदे-फडणवीस – अजितदादा यांचे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. पण आरक्षण आंदोलनाच्या पडद्या आडून काहीजण पक्षीय राजकारण करीत आहेत. परंतु अशांना जनता ओळखून आहे. लोह्याचा सातबारा भाजपाचा हे सिद्ध झालाय त्यामुळे उपाऱ्यांनी येथे लुडबुड करू नये. येथील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे चिखलीकर हेच विकास करू शकतात हे शहरवासीयांना जाणीव आहे. शहरात आता प्रशस्त रोड होणार आहे. जे जे निवडणूक काळात आश्वासन दिले त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न असून, शहरातील मोंढा यार्डातील रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होईल. असे सांगून या शहरातील दोन्ही तालुक्यातील जनतेनी नेहमीच साथ दिली आहे. जत्रेतील दुकान पुढच्या वेळी राहील की नाही याची गॅरंटी नाही असे चौफेर फटकेबाजी जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली.
लोहा शहरातून जाणाऱ्या बाय पास टू बायपास या नॅशनल हायवेच्या २३ कोटी ४२ लक्ष रुपयाच्या मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते पोलीस ठाण्या समोरील जागेत करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्यासाठी युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर, भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार ज्येष्ठ नेते केरबाजी बिडवई तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, उपनगराध्यक्ष दता वाले, माजी सभापती बालाजी पाटील मारतळेकर, माजी गट नेते करिम शेख माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, कंधार भाजपा तालुकाक्ष किशनराव डफडे, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी कृउबा उप सभापती बळी पाटील, माजी उपसभापती बालाजी पाटील कदम , शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पवार, माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी, माजी जि प सदस्य गणेशराव सावळे,बालाजी खिल्लारे, माजी पाणीपुरवठा सभापती आप्पाराव, पवार,नारायण येलरवाड, मारुती पाटील बोरगावकर, हरिभाऊ चव्हाण, दिनेश तेललवार, दीपक कानवटे, लक्ष्मणराव बोडके, अर्जुन राठोड, यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज चौफेर फटकेबाजी करत मराठा आरक्षणाच्या पडद्या आड जे काही द्वेषाचे राजकारण करतात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील तरुणांचे डोके भडकविण्याचे राजकारण करीत आहेत अशांना फटकारले. आ श्यामसुंदर शिंदे यांचा नामोउल्लेख टाळत त्याच्यावर चौफेर टीका केली निमंत्रण पत्रिकेत नाव असावे म्हणून काहीजण हट्टास करतात. पण त्यांना निधी केंद्र सरकार की राज्य सरकारचा आहे हे कळत नाही .अमाप पैशा असेल पण त्याला दानत लागते. कार्यकर्ते उभे करावे लागतात त्याच्या सुखदुःखात सहभागी व्हावे लागते असे सांगितले.
शहरातील मोंढा यार्डात रस्त्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. बुद्ध विहार शादिखाना याचा जागेचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे नमूद केले . येणाऱ्या मार्केट कमिटी निवडणूकीत आपल्याच सर्व जागा निवडून येथील असा विश्वास व्यक्त करत शहरातील जनतेची सदैव साथ आहे. सातबारा कोणाचा(?) हे आज कळले असेल उपऱ्यानी लुडबुड करू नये असे आपल्या खास शैलीत प्रतापरावानी नाव न घेता विरोधकांना बजावले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव मुकदम यांनी केले रस्ता मंजूर केल्या बद्दल त्यांनी खा चिखलीकर यांचे आभार मानले. नगर पालिका क्षेत्रातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाहीत याकडे खा चिखलीकर यांचे लक्ष वेधले.शहरातील वाहतूक व कायदा सुव्यवस्था बद्दल त्यांनी पोलीस निरीक्षक चिंचोळकर व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे हार तुरे सत्कार , वाजंत्री, आतिषबाजी टाळण्याचे युवा नेते प्रवीण पाटील यांनी सांगितले होते. त्याचे पालन करण्यात आले व साधेपणाने भूमिपूजन सोहळा पार पडला.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खा. चिखलीकर यांनी पाठ पुरावा केला व रस्ता मंजूर करून आणला. के.टी. आय.एल. ही कंपनी काम करणार आहे. तत्पूर्वी मराठा आरक्षणासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर साखळी उपोषण सुरू आहे. त्या उपोषणास खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट दिली. आपण सोबत आहोत मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठींबा आहे अस आश्वासन त्यानी दिले. संचलन प्रसिद्ध निवेदक विक्रम कदम यांनी तर आभार नगरसेवक भास्कर पाटील यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमकाळात शहर पोलीस बंदोबस्त होता पण कुठेही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष.