क्राईमनांदेड

हिमायतनगरच्या चौपाटी भागातील मटका अड्ड्यावर नांदेडच्या एलसीबी पथकाचा छापा

हिमायतनगर। शहरातील चौपाटी भागातील मटका जुगार अड्ड्यावर एलसीबीचा पथकाने छापा मारून कार्यवाही केली आहे. त्यानंतर देखील शिपायातनांगर शहरातील अनेक ठिकाणच्या चौकाचौकात दिवसाढवळ्या मटक्याच्या चिठ्या फाडल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एलसीबीएच्या पथकाने अचानकपणे शहरातील थैकठिकाणी एकच वेळी छापे करून कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे मत व्यसनाच्या अधीन गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांतून केली जात आहे.

हिमायतनगर शहरासह तालुका परिसरात गेल्या काही महिन्यापासून जुगार, मटका, गुटखा, अवैद्य दारू विक्री यासारखे अवैद्य धंदे जोमात सुरु आहेत. मात्र स्थानिक पोलीस प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने या नंबर दोनच्या धंदेवाल्यांचे फावले जात आहे. त्यामुळे शहर व तालुका परिसरातील युवा पिढी व्यसनाच्या अधीन जात असून, यामुळे उद्याचे उज्वल भविष्य धोक्यात आले आहे. हि बाब लक्षात घेता कोणीतरी नागरीकाने हिमायतनगर शहरात मटका, गुटखा, सुरु असल्याची गुप्त माहिती नणंदेच्या एल्ससीबी पथकास दिली होती.

त्यावरून दिनांक 09 ऑकटोबर 2023 रोजी दुपारी 13.20 वाजेच्या सुमारास, हिमायतनगर शहरातील चौपाटी प्रॉपर परिसरातील जब्बारखान यांचे घरा समोरील पोस्ट ऑफिस परिसरातील मोकळया जागेत यातील नमुद आरोपीने बिना परवाना
बेकायदेशिरीत्या मिलन डे नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना आढळून आला. त्याच्याकडून एलसीबीच्या पथकाने 2 हजार 820/-रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. यावरून फिर्यादी पोहेकॉ, हनुमंत रघुनाथराव पोतदार, स्थागुशा नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे हिमायतनगर येथे गुरनं 207 /2023 कलम 12 (अ) म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बी दि भूसांर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कागणे हे करीत आहेत.

एलसीबीच्या पथकाने केलेल्या या एका कार्यवाहीची जरी पोलिसांची वाचक निर्माण झाली असली तरी शहरात सुरु असलेल्या अन्य ठिकाणच्या गुटखा, मटका,जुगार, अड्ड्याकडे एलसीबीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया अवैद्य धंद्याच्या विरोध कर्नाऱ्यामधून केली जात आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!