नांदेड। सप्तरंग सेवाभावी संस्था संचलित लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व शिवास्मी कल्चरल फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील विद्यार्थी कलावंत यांनी वृंदावन येथे आयोजित तेरावे आंतरराष्ट्रीय कृष्ण रंग महोत्सव मध्ये नृत्य स्पर्धेत भाग घेऊन अनेक बक्षीस पटकावले.
दरवर्षी नवीन वर्षाच्या आगमनासाठी सांस्कृतिक महोत्सवाच्या रूपाने वृंदावन उत्तर प्रदेश येथे कृष्ण रंग महोत्सव आंतरराष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा व महोत्सवाचे भव्य आयोजन ब्रिज संग्रहालय सभागृहामध्ये आयोजित होत असतं. सदरील कार्यक्रम यावर्षी देखील आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये नांदेड येथील बारा विद्यार्थी कलावंतांनी आपला सहभाग नोंदवून विविध बक्षिस प्राप्त केले. यामध्ये नांदेड येथील प्रसिद्ध कलावंत डॉ. सान्वी जेठवाणी यांना बृज वैजयंती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं व शुभम बिरकुरे यांना राष्ट्रीय उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये लोक नृत्य एकल स्पर्धेमध्ये विविध गटात प्रथम पारितोषिक प्राप्त करणारे विद्यार्थी आहेत आर्या सोनवणे लावणी, अस्मि धोपटे गवळण व साक्षी मणियार गोंधळ जागर सादर करून बक्षीस प्राप्त केले. मॉडन नृत्य एकच स्पर्धेमध्ये प्रथम प्राश्तोशिक प्राप्त करणारे विजय चव्हाण व सिद्धी बुलबुले आहेत तर या मॉडर्न नृत्य स्पर्धेमध्ये अनमोल झा हिला द्वितीय, साक्षी उदगीरकर हिला तृतीय तर श्रेयस विजयकुमार उदगीरकर याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले.
उपशास्त्रीय नृत्यांमध्ये संस्कृती बियाणे हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले व समूह नृत्यांमध्ये सेवास्मिकल्चरल फाउंडेशन यांनी शिवतांडव सादर करून प्रथम पारितोषिक प्राप्त केले तर नृत्य नाटिका स्पर्धेमध्ये लय स्कूल या समूहाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
या स्पर्धेमध्ये मध्य प्रदेश हरियाणा झारखंड बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब दिल्ली अशा विविध राज्यातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता अति तटीची स्पर्धेमध्ये नांदेडच्या या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले असून त्यांचं सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. व या सर्व सादरीकरणाचे प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत या सर्व स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने वाहवा मिळवली. या सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व संस्थेच्या वतीने डॉ. सान्वी जेठवाणी, शुभम बिरकुरे, अक्षय कदम, गणेश चांडोळकर, नईम खान या सर्वांनी अभिनंदन केले.