हिमायतनगर,परमेश्वर काळे | हिमायतनगर येथील अण्णाभाऊ साठे नगरात आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात नुकतीच ऊत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी मु.अ. पि. एम. बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात बनसोडे म्हणाले की, आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी गोरगरीबांची मुले शिकली पाहीजेत, म्हणुन आपल्या मनगटाच्या जोरावर माता सावित्रीबाई फूले यांना आपले संरक्षण दिले. म्हणुन सावित्रीबाई फूले यांनी मुलींना शिक्षण देऊन त्या काळी महिलांना साक्षर केले. इंग्रजाविरूद्ध लढत असताना आपल्या स्वकिययांशी त्यांनी दोन हात केले. वर्ण व्यवस्थेविरुद्ध लढून भारतीय स्वातंत्र्यातही लहूजीनी मोलाचा वाटा उचलला आहे. असे प्रतिपादन मु. अ. पि. एम. बनसोडे यांनी केले.
हिमायतनगर येथे आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बनसोडे बोलत होते. लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त साठेनगरात लहुजी शक्ती सेनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष संतोष हातवेगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हिमायतनगर पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ शिराणे यांनी संविधानाचे वाचन करून क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला व तसेच हातवेगळे यांनी ही लहुजी वस्ताद साळवे यांच्या जिवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलतांना बनसोडे म्हणाले की, मातंग समाजाने शिक्षणाविषयी जागरूक होवून, आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आपल्या जीवनाचा उत्कृष्य शिक्षणात आहे. हे आपण कृतीत उतरून कामाला लागावे. असे अवाहन मु. अ. बनसोडे यांनी केले. लहुजी साळवे यांना सामूहिक अभिवादन केल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यानी लहुजी साळवे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येवून अण्णाभाऊ साठे नगर येथे मिरवणूक विसर्जित करण्यात आली. यावेळी संतोष बनसोडे, संदिप गुंडेकर, विकास मनपुर्वे, संदिप बनसोडे, शिवप्रसाद बनसोडे, बालाजी बनसोडे, गजानन वाघमारे, टेकेवाड, सुरज सोळंके, रोशन बनसोडे आदींसह समाज बांधवांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.