हदगाव/हिमायतनगर। खरीप हंगाम सन 2023/24 मधिल नुकासनग्रस्त शेतकरी बंधवाना विमा संक्रमित रक्कम तात्काळ देन्यात यावी अशी मागणी आज मंत्रीकृषि मा. ना. श्री धनंजय मुड़े यांची मुंबई येथे भेट घेउन आ. माधवराव पाटिल जवळगावकर यानी निवेदन देऊन केली आहे. मंत्री मोहदय दखल घेऊन नांदेड जिल्हाधिकारी याना भ्रमणध्वनी द्वारा संपर्क करुण याविषयी 18जून रोजी विमा कंपनी सोबत होनार्या बैठकित घेनार असल्याचे सांगुन माहिती पाठवा आश्या सूचना केल्या. उपोषणला बसलेल्या शेतकरी बंधवाना देउन उपोषण सोडवन्या संबधी विनती करण्यास सांगीतले आहे. यामुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
खरीप हंगाम २०२३-२४ सोयाबीन कापूस, तुर पिकाचे नुकसान झाल्यामुळे विमा संरक्षित रक्कम न मिळाल्यामुळे मतदार संघातील शेतकरी बांधव उपोषणास बसले आहेत. उपोषणकर्ते हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघातील असल्याची दखल घेऊन आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तसेच गतवर्षी सोयाबीन, कापूस, तूर, ही पिके अति पावसामुळे वाहून खरडून जावून पूर्णतः शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झालले. तसेच काही पिके सुरूवातीला कमी पावसामुळे करपून गेले आहेत.
एव्हढेच नाहीतर सोयाबीनवर येलो मोझेक नावाच्या व्हायरसमुळे उत्पन्नात ७० ते ८० टक्के पर्यंत सोयाबीन पिकाची घट आली. ही सर्व परिस्थिती बघून आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला मध्य हंगाम प्रतिकृता या सदराखाली २५ टक्के अग्रीम देण्यासाठी अधिसुचना काढलेली आहे. परंतु ३ महिन्याचा कालावधी उलटून सुध्दा कंपनीने अद्यापपर्यंत शेतक-यांना/विमा धारकांना उर्वरित रक्कम दिलेली नाही. त्यामुळे हदगाव व हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांमध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरोधात जनआक्रोष निर्माण झालेला आहे.