हडको येथील enrich a play school विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

नवीन नांदेड l हडको परिसरातील वात्सल्य नगर भागातील ईनरिच ऐ प्ले स्कुल व प्रबोध विद्यामंदिर या शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दिनांक १३ जून २४ रोजी शाळेची वर्षाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आली, पहिल्या सत्रात शाळेत मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ व विविध देखाव्यासह करण्यात आले , यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली कृष्णा किंगरे यांनी सरस्वती पूजन व मुलांचा अक्षर अभ्यास करून शाळेत स्वागत केले.शाळेत विविध उपक्रम राबवण्यात आले.
मुलांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले पाहण्यात आले.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग आणि पाणी बॉटल देण्यात आले,हा उपक्रम राबवण्यासाठी सौं.लक्ष्मी महाजन,अर्चना केन्द्रे , रोहिणी जहागीरदार प्रचिती कुलकर्णी,दीपिका वाखरडकर,सुरेखा कोल्हे, कोमल तरंगे,व सुमेध बदरगे, आणि वंदना ताई व शांतताई यांनी परिश्रम घेतले.
