भक्तगणांसह साईनाथ महाराज बितनाळकर यांची मराठा आरक्षणाला पाठिंबा
नांदेड| आपल्या कीर्तनातून जनजागृती करणारे आणि आपल्या अमोघ वाणीतून सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक तथा राष्ट्रीय पातळीवर प्रबोधन करणारे द. भ. प. साईनाथ महाराज बितनाळकर यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज पाटील जरांगे यांची भेट घेतली आणि मराठा उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशीही केली.
यावेळी समवेत भक्तमंडळी भाऊ पाटील हाडसणीकर, दतु पाटील, निळू पाटील, दता पाटील, पुडलींक पाटील, अंकुश पाटील, विलास पाटील, अर्जुन पाटील, इतर पाटील, ढकू पाटील, गोविंद पाटील, मधुकर शेगोळे, माळकोणी ढोले, रामा ठोंबरे, राहुल गोरे, बोचरे,रमेश टमखाने,फाळके, लक्ष्मण ढगे, अविनाश पाटील, हुलकावणे, अविनाश भालेराव, डोळस यांची उपस्थिती होती.
मराठा आरक्षणाबाबत निर्वाणीचा इशारा देत पाण्याचा थेंबही ग्रहण न करण्याचा कठोर निग्रह करणारे संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. मराठवाड्यात आरक्षणाची आग धुमसत असतांना सर्वपक्षीय नेत्यांचे आव्हानही त्यांनी धुडकावले आहे. श्रीक्षेत्र माहूरगडच्या आनंद दत्तधाम मठाचे अधिपती सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. परिवारातील सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना धीर दिला. यावेळी सरकारने तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.