नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत “क” झोन वेट लिफ्टिंग,पावर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स या स्पर्धेचे आयोजन नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड द्वारे करण्यात आले या स्पर्धेमध्ये कै.वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाच्या सलोनी सावामचल वेट लिफ्टिंग व पॉवर लिफ्टिंग 49केजी वजन गटात प्रथम. मोनिका खंदारे 59केजी गटात प्रथम.
ओमकार मारतळे 61केजी वेट लिफ्टिंग मध्ये प्रथम अमित सावामचल 63केजी पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग मध्ये प्रथम.बिलाल खान 70केजी वजनगटात प्रथम.अमित सावामचल 60 केजी वजन गटात प्रथम अशा प्रकारे सर्वात जास्त गोल्ड मेडल व सिल्व्हर मेडल प्राप्त करून यावर्षीचे सर्वसाधारण विजेतेपद कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयाला मिळाले.या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य क्रीडा संचालक डॉ.उस्मान गणि यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
या घवघवीत यशाबद्दल बानो एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मो.मजरुद्दीन मो.खलीलोद्दीन, सचिव अर्जुमंदबानो यास्मिन,प्राचार्य डाॅ.उस्मान गणी,प्रा.डॉ. बाबासाहेब भुकतरे,प्रा.डॉ. स्मिता कोंडेवार,प्रा.मो. इस्माईल,प्रा.पुष्पा क्षीरसागर,प्रा.डॉ.सय्यद वाजिद,प्रा.शेख नजीर,प्रा.डॉ. फर्जाना बेगम,प्रा.अक्षय हासेवाड,प्रा.दानिश,प्रा. समीना,प्रा.अजमत बेगम प्रा.नुरी बेगम,प्रा.निजाम इनामदार,प्रा.सबा बेगम, मोहम्मद मोहसीन यांनी अभिनंदन केले आहे.