बिलोली। बिलोली येथील रहिवासी कै. शेषराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ दि. ८ फेब्रुवारी रोजी नांदेड शहरातील जलतरण तलाव येथे जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेते व जीवरक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील रहिवासी तथा देगलूर येथील एका नामांकित संस्थेचे कर्मचारी व सहकार क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्व बसवंतराव मुंडकर पाटील यांचे द्वितीय चिरंजीव कै. शेषराव मुंडकर यांचे गत २५ वर्षापुर्वी तरूण वयातच अपघाती निधन झाले होते. कै. शेषराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ बिलोली येथे दरवर्षी अनेक कार्यक्रम होत असतात.
यावर्षी बिलोली येथे होणाऱ्या नित्य कार्यक्रमांसह जलतरण स्पर्धा घेण्याचे १० दिवसापूर्वी नियोजन करण्यात आले होते. नियोजना नुसार दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी नांदेड येथील जलतरण तलावात जलतरण स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 14 ते 17 वयोगटातील ५० मीटर फ्री, ५० मीटर बेस्ट, १०० मीटर फ्री या प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. सदर जलतरण स्पर्धेत अजिंक्य नरवाडे, संकेत कमलाकर, आविश वाघमारे, ऋषिकेश बनवडे, जीनल बिंगेवार जलतरणपटू नी यश संपादन केले.
या स्पर्धेत विजयी झालेल्या जलतरणपटूसह मयूर केंद्रे व संघर्ष सोनकांबळे या जिवरक्षकांचा लवकरच मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. विषेश म्हणजे मयूर केंद्र या जिवरक्षकाने किशोरावस्थे पासुनच जलतरणात रस घेऊन प्राविण्य मिळविले आहे. विविध स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच जिवरक्षकाची भुमिका मोठ्या नेटाने निभावत आहे. कै. शेषराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ पार पडलेल्या जलतरण स्पर्धेसाठी राजेश सोनकांबळे, तुकाराम व मधुकर केंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.