हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर यात्रेत बुधवारी भव्य पशुप्रदर्शन स्पर्धा मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास शेकडो बैल जोडी, लाल कंधारी बैल जोडी, गावरान गाय, गावरण कालवड आदी पशूंना घेऊन पशुपालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये हिमायतनगर तालुक्यातील मौजे रमणवाडीच्या सुभाष उद्धवजी जाधव यांच्या गावरान बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
गावरान बैल जोडीमध्ये लालबाराव भीमराव अडबलवाड राहणार सरसम यांच्या जोडीने दुसरा क्रमांक, तिसऱ्या क्रमांकावर मोहन रामचंद्र पाटील हिमायतनगर यांची बैलगाडी आली तर लाल कंधारी बैल जोडीमध्ये प्रथम क्रमांक आकाश गुलाबसिंह चव्हाण हिमायतनगर, दुसरा क्रमांक योगेश शिवदर्शन वटपलवाड, गावरान वळू मध्ये प्रथम क्रमांक पंडित गुंजाजी डोंगरे पळशी, दुसरा क्रमांक शिवराम माधवराव मिरासे सरसम, प्रोत्साहनपर नारायण दिगंबर गुंडेवार यांना देण्यात आले.
गावरान गाय मध्ये प्रथम क्रमांक दत्ता भोजना कोमलवाड, दुसरा क्रमांक विनायक साईनाथ जंगीलवाड पवना, गावरान कालवड मध्ये प्रथम क्रमांक परमेश्वर नारायण मोरे हिमायतनगर, दुसरा क्रमांक पवन निर्गुण जाधव रमणवाडी, लाल कंधारी कालवड मध्ये प्रथम क्रमांक प्रवीण उत्तमराव सूर्यवंशी पळसपुर, दुसऱ्या क्रमांका शफी नवीन शेख पारडी, लाल कंधारी गाय मध्ये प्रथम क्रमांक प्रकाश नारायण राऊलवाड हिमायतनगर, दुसरा क्रमांक मारुती शंकरराव तुंबलवाड हिमायतनगर यांना देण्यात आला. पशु प्रदर्शन स्पर्धेचं परीक्षण पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के, डॉ बिराजदार, डॉ गजानन शिवराम यांनी केले.
याप्रसंगी परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर केंद्र श्री श्री आनंदराव देवकते, यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, पशुप्रदर्शन समितीचे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, श्यामराव चव्हाण, दिगंबर वानखेडे, प्रभाकर मुधोळकर, अडबलवड गुरुजी, संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, उदय देशपांडे, राजू राहुलवाड, नारायण करेवाड, संदीप तुपतेवार, इंगळे, आदिंसह मोठया प्रमाणावर शेतकरी, पशुपालक, यात्रेकरू उपस्थित होते. पशुप्रदर्शन स्पर्धेचं सुत्रसंचालन अशोक अनगुलवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय माने यांनी मानले.