
हिमायतनगर। हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. शेख शेहनाज बेगम अहेमद मॅडम यांना दरवर्षी दिला जाणारा विद्योत्तमा साहित्य कर्मयोगी सन्मान 2024 चा पुरस्कार दिला.
हा पुरस्कार विद्योत्तमा फांउडेशन नाशिक द्वारा दिला जातो.हा पुरस्कार “मंजुल भगत के उपन्यासों मे नारी” या पुस्तकासाठी दिला.पुरस्काराचे स्वरूप शाल ,स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र व धनराशी असे होते.
महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांनी डॉ. शेख शहेनाज मॅडम यांचे मनापासून अभिनंदन व कौतुकाची थाप दिली.त्याचप्रमाणे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील मॅडमचे मनापासून अभिनंदन केले.
