खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढे अनुसया काळे यांनी केला रुग्णालय प्रश्नावर गंभीर आरोप

नांदेड| रुग्णालयात एका साडेचार महिन्यांच्या मुलगी श्रेया हिचा मृत्यू झाला. परंतु मीडियाला माहिती दिली म्हणून तिच्यावरील उपचार थांबवण्यात आले होते, असा गंभीर आरोप मुलीची आई अनुसया काळे यांनी खा. सुप्रिया सुळे यांनी भेट दिल्यानंतर केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळला आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरूच असून, मागील दिनांक ३ ते ४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत १४ अति गंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात तीन नवजात बालके, एक बालक व दहा प्रौढांचा समावेश आहे. तसेच अत्यवस्थ ६६ नवजात बालकांवर एनआयसीयूत तर १२ अन्य रुग्णांवर आयसीयूत उपचार करण्यात येत आहेत.
चार दिवसांत मृतांची संख्या ५१ वर पोहोचली असून, रुग्णालयात एका साडेचार महिन्यांची मुलगी श्रेया हिचा मृत्यू झाला. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका साडेचार महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. खासदार सुप्रिया सुळेंसमोर मृत बाळाच्या आईने टाहो फोडला आणि मीडियाला माहिती का दिली म्हणून बाळावरील उपचार थांबवले, असा आरोप मृत मुलीची आई अनुसया उत्तम काळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर केला. काळे मूळ पैठण येथील रहिवासी असून, सध्या अर्धापूर येथे राहतात. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळले असून जन्मत:च मुलीच्या हृदयाला छिद्र होते, असा दावा केला आहे.
