हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार। खाजगी अवैध सावकारीला आळा घलण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. बेकायदेशीर सावकाराच्या विरुध्द तक्रारी असल्यास अवैध सावकारीग्रस्त नागरीकांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, हिमायतनगर येथे संपर्क साधून तक्रार द्यावी असे आव्हान सहाय्यक निबंधक जी. जी. मिराशे यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे, यासाठी महत्वाची भुमिका ठरलेला अवैध सावकारी हा भाग असून, ती रोखण्याची जबाबदारी सहायक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधकाकडे सोपविण्यात आलेली आहे. अवैध सावकारांना पायबंद घालण्यासाठी शासनाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ हा सुधारीत कायदा संपूर्ण राज्यभर लागू केला आहे.
या नव्या कायद्यानुसा विनापरवाना सावकारी कारणान्यास पाच वर्षापर्यंत कैदेची शिक्षा किंवा पन्नास हजार रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतुद केली आहे. अवैध सावकाराकडून शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जाचा व्याज दर मोठा असल्याने बहूतांश शेतक-याकडून कर्ज फेडणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतजमीन अवैध सावकारांच्या घशात जाते परिणामी शेतकरी व नागरीक आत्महत्या करतात. अवैध सावकारी रोखण्यासाठी सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेकडे कायदेशीर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
कर्ज घेण्याची वेळ आली तर सावकार हा परवनाधारक आहे किंवा नाही याची खात्री करावी आणि व्याजदर निश्चित करुनच कर्ज घ्यावे. सावकाराकडून फसवणूक अथवा उपद्रव होत असल्यास सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नांदेड किनवट रोड उमरचौक हिमायतनगर कार्यालय येथे रितसर तक्रार दाखल करावी असे देखील आव्हान सहाय्यक निबंधक, हिमायतनगर कार्यालयाडून करण्यात येत आहे. असे प्रसिद्धी पत्रक सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. हिमायतनगर जी नांदेड यांनी जारी केले आहे.