हिमायतनगर। मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्था संचलित, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर येथे समाजशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.उज्ज्वला सदवर्ते ह्या होत्या तर प्रमुख व्याख्याती म्हणून हिन्दी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ . शेख शहेनाज मॅडम होत्या, तसेच व्यासपीठावर स्टॉप सेक्रेटरी प्रा.डॉ.डि.के कदम व महाविद्यालयातील नॅक समन्वयक प्रा.डॉ.गजानन दगडे हे उपस्थित होते. तसेच प्राणीशास्त्र विभागाच्या डॉ. बोंडारे मॅडम तसेच तोटावाढ मॅडम, आगलावे मॅडम स्टेज वरती उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले आणि हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. डि .के .कदम सर यांनी केले . नंतर महाविद्यालयातील एका विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यानंतर प्रमुख व्याख्याती म्हणून लाभलेल्या डॉक्टर शहेनाज मॅडम यांनी स्त्रिया विषयी अनेक उदाहरणे दिली स्त्री आज कशी सक्षम आहे त्याचबरोबर रामायणातील प्रभुराम सीता यांची उदाहरणे दिली .
नंतर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी स्त्री चे अस्तित्व समाजामध्ये काय आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर उज्वला सदावर्ते मॅडम यांनी महाविद्यालयातील सर्व महिलांना एक विशेष भेटवस्तू दिली या मध्ये डॉक्टर बोंडारे मॅडम, शहेनाज मॅडम ,आगलावे मॅडम , तोटावाड मॅडम ,मस्के ताई , नगारे ताई ,यांना भेटवस्तू दिल्या.
तसेच जागतिक महिला दिना निमिप्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रथम क्रमांक बक्षिस वैष्णवी विनायक वटटवाड द्वितीय आमतुला जवेरीया तृतीय गीता चिकनेपवाड आणि अदिबा खयूम. यास प्रोत्साहन पर पारितोषिक व रक्कम त्यांना देण्यात आली.सदरील कार्यक्रम हा समाजशास्त्र विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये आदरणीय डी .के. कदम सर आणि विश्वनाथ कदम सर यांनी आथक परिश्रम घेतले.
सदरील कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन डॉ. वसंत कदम सर यांनी तर आभार कुमारी सोनल पंतगे या विद्यार्थीनी केले, सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.