नांदेड। गुरु रविदास जयंतीनिमित्त नांदेड शहरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे विपुल मल्टी सर्व्हिसेस होलसेल फूटवेअर, गुरुद्वारा रोड नांदेड येथे चर्मोद्योग व्यापाऱ्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पुस्तके, मिठाई आणि पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने सार्वजनिक जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अकरा वाजता म. फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेली मिरवणूक वाजत गाजत दुपारी अडीच वाजता गुरुद्वारा रोडवरील विपुल मल्टी सर्व्हिसेस होलसेल फूटवेअर समोर आली. यावेळी चर्मकार समाजातील व्यापारी दादाराव वाघमारे (सुरेश फूट वेअर, भाग्यनगर), नारायण अन्नपुरे (रमण बूट हाऊस, तरोडा नाका), नागोराव गंगासागरे (रवी बूट हाऊस, ईतवारा), विपुल देगलूरकर (विपुल फूट वेअर, मुरमुरा मार्केट रोड) आणि परमेश्वर गोणारे (रविराज फूट वेअर, वजिराबाद चौक) यांनी या शोभायात्रेचे फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य स्वागत केले.
यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक तथा विपुल मल्टी सर्व्हिसेस होलसेल फूट वेअरचेे मालक इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर तसेच नारायण अन्नपुरे, दादाराव वाघमारे, नागोराव गंगासागरे, परमेश्वर गंगासागरे, सुरेश वाघमारे आदींनी मिरवणुकीतील गुरु रविदास प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद जोगदंड यांचे यावेळी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक सुरजितसिंघ गिरणीवाले, प्रा. डाॅ. चंद्रभान गंगासागरे (पूर्णा), बाळासाहेब जगताप, शंकर धडके, संजय सोनटक्के, गजानन जोगदंड, विठ्ठल वाघमारे, राजेंद्र कांबळे, बालाजी देशमाने, उत्तम टोम्पे, संदिप गोरे, के. के. गंगासागरे, सुनील माहुरे, नागेश भालके, दिगंबर गंगासागरे, मोहसीन खान, गोविंद कोलंबीकर, चंद्रकांत अन्नपुरे, अरुण उकंडे, केशव अन्नपुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.