हदगाव/ हिमायतनगर। गोदावरी अर्बनची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात गेली एक दशकापासून आर्थिक घोडदौड सुरू आहे. केदारेश्वरच्या आशिर्वादाने तामसा नगरीतील ही शाखा शतकवीर ठरली हा दैवी योगच आहे. असे मत गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी तामसा येथील शाखा कार्यारंभ प्रसंगी मत व्यक्त केले.
तामसा येथील गोदावरी अर्बनच्या शाखेचा कार्यारंभ केदारेश्वर देवस्थानाचे महंत श्री. मृत्युंजय भारती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्ह्याप्रमुख बाबुराव कदम, जागा मालक तथा प्रतिष्ठीत व्यापारी रवी बंडेवार प्रतिष्ठीत व्यापारी लक्ष्मीकांत दुतकवाडे, रमेश पाटणी, गोविंदशेठ जामठेकर, अनंता भोपळे, संतोष नीलावार, सुशील मेहेत्रे, अतुल बंडेवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रतिष्ठीत बँकेच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलतांना राजश्री पाटील म्हणाल्या की, गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील यांनी सर्वसामान्य नागरीकांच्या बँकिंग क्षेत्रातील अडचणी लक्षात घेऊन दहा वर्षापूर्वी पहिल्या शाखेचे रोपटे लावले होते, आज तामसा येथील शंभराव्या शाखेच्या माध्यमातून वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तामसा नगरीतील नागरिकांची शाखेची मागणी पूर्ण झाली याचा मला आनंद आहे.
गोदावरी अर्बन ही कायमच ग्राहकाभिमुख काम करीत असते. सहकार क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनाखाली संस्था पाच राज्यातील सर्व शाखांमध्ये आर.बी.आयच्या आदर्श निकषाचे पालन करीत काम करते. तसेच ग्राहकांना आर.टी.जी.एस., एन.एफ.टी., कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा अत्याधुनिक व अद्यावत सेवा देत आहे.
या कार्यक्रमास महिला आघाडी जिल्ह्याप्रमुख शीतल भांगे, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हाडसणीकर, राजेश माने, बापूराव घारके, बालाजी राठोड, केशव हरण, केशव हुजूरगे, लक्ष्मीकांत दूतकावडे, गोदावरी अर्बनच्या मुख्यालयाचे प्रशांत कदम, महेश केंद्रे, उमरखेड शाखेचे व्यवस्थापक धंनजय क्षिरसागर, तामसा शाखेचे अधिकारी सागर चव्हाण व कर्मचारी वृंद यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.