नांदेड| स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी आज दिनांक 11/12/2023 रोजी सपोनि माने व पोउपनि काळे यांचे टिमला अग्निशस्त्रा संबधाने कारवाई करण्याचे आदेश देवुन रवाना केले होते.
अग्निशस्त्रा मधील रेकॉर्ड वरील आरोपीस चेक करीत असतांना पोउपनि काळे यांना माहीती मिळाले की नाळेश्वर येथील आकाश वाघोळे व त्याचे सोबत एकजन विना नंबरचे मोटार सायकलवर फिरत असुन त्यांचे जवळ पिस्टल आहे असी खात्रीशीर माहीती मिळाले वरुन त्यांनी आज रोजी पंचासह नाळेश्वर शिवारात सदर इसमाचा शोध घेत असताना नाळेश्वर ते नांदेड रोडवर त्यांना एका विनानंबरचे मो.सा. वर दोन इसम येत असतांना दिसुन आले सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांची नाव गाव विचारले असता 1. आकाश व्यंकटी वाघोळे वय 25 वर्षे व्यवसाय बेकार रा. नाळेश्वर ता. जि. नांदेड 2. सय्यद वसीम सय्यद काशीम वय 32 वर्षे व्यवसाय बेकार रा. दुलेशाहा रहीमान नगर वाघीरोड नांदेड असे सांगीतले त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता इसम नामे सय्यद वसीम सय्यद काशीम वय 32 वर्षे व्यवसाय बेकार रा. दुलेशाहा रहीमान नगर वाघीरोड नांदेड याचे कमरेला एक अग्निशस्त्र (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुस किमती 27,000/- रुपयाचे अग्निशस्त्र मिळुन आले आकाश व्यंकटी वाघोळे याचे ताब्यातुन एक बजाज कंपनीची 220 मॉडेलची विनाबंरची मो.सा. किमती 1,70,000/- मिळुन आली असे एकुण 1,97,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपी विरुध्द पोउपनि श्री हत्तात्रय काळे यांनी पो.स्टे. लिंबगाव येथे फिर्याद दिली आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि पांडुरंग नाने, पोउपनि / दत्तात्रय काळे, आशीष बोराटे, पोहेका गंगाधर कदम, बालाजी तेलंग, अफजल पठाण, पोकों / गणेश धुमाळ, विलास कदम, रनंधीस् राजबन्शी, धम्मा जाधव, गजानन बयनवाड, विठ्ठल शेळके, मोतीराम पवार, चालक पोकों/ हनुमान ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.