वासवी क्लब सिडको नवीन नांदेड तर्फे आयोजित गजर हरिनामाचा व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
नवीन नांदेड l प्रति वर्षाप्रमाणे आषाढी महोत्सव यावर्षी सुद्धा गोविंद गार्डन सिडको नवीन नांदेड येथे गजर हरिनामाचा व सिडको हडको भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम वासवी क्लब व वनिता क्लब सिडको नवीन नांदेड तर्फे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेश रायेवार तर प्रमुख पाहुणे दिलीप कंदकुर्ते ,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयलाने,४०१ गव्हर्नर राहुल चिद्रावार, नागनाथ महाजन सर, सुधीर बिडवई,सोमेश कोटलवार, सिडको वासवी क्लब चे अध्यक्ष संदीप येरावार ,सचिव बालाजी कवटिकवार,कोषाध्यक्ष मयूर बिडवई, वनिता क्लब व वनिता क्लब चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना दिलीप कंदकुर्ते म्हणाले समाजाचे काहीतरी देणे लागते तेव्हा समाजासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. तळागाळातील गरीब व होतकरू मुला मुलींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे याप्रसंगी आव्हान केले.
भक्ती संगीतात सुरेख भक्ती गीत सादर करून भाविक भक्तांना मंत्रमुक्त केले. या संगीत संचात अनेक कलाकारांनी विनामूल्य आपली सेवा देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. निमा यलमेवार ,आकांक्षा मोतेवार, साईनाथ लिंगाडे, शिव मठपती ,पूजा आईलवार, निळकंठ कंधारे ,आशिष कहाळेकर, कुलदीप कोत्तापल्ले , विशाल शिरसे, जसपाल सोनकांबळे, उत्तम कांबळे ,गणेश दुधाटे ,बाबुराव पांचाळ, वेदिका बोंबीलवार, वेदिका बोंपिलवार, गोविंद कंधारे,संजय शेवाळकर, मानसी करवंदे ,सुनील गुरु ,विद्या पेटकर,पवन चौंदते, उत्कृष्ट निवेदक संजय काचावार अधिक कलाकाराने सहभाग नोंदवून भाविक भक्तांना भक्ती गीताचा आस्वाद दिला.या कर्यक्रमा साठी अहो रात्र मेहनत घेतलेले गोविंद कवटिकवार, गजानन बंडेवार,लक्ष्मण रेवणवार, रवींद्र दमकोंडवार,शिवानंद नीलावार, बालाजी रहाटकर,डॉ. संतोष महाजन,संतोष सोमशेटवार, प्रसन्ना उत्तरवार,तुकाराम पातेवार,
प्रा.अशोक कमठाने ,तसेच वासवी व वासवी वनिता क्लबचे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.