रब्बी हंगामासाठी निम्म मानार प्रकल्पातून पहिली पाणी पाळी 25 नोव्हेंबर पासून सुरु

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| जिल्ह्यातील निम्न मानार प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेवून रब्बी हंगाम 2023 साठी तीन पाणीपाळया देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निम्न मानार प्रकल्पातून प्रथम रब्बी हंगामासाठी पाणी पाळी 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व बागायतदारांनी पाटबंधारे शाखेत रितसर पाणी अर्ज देऊन पाणीपट्टी भरुन सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

निम्न मानार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील लाभधारकांनी रब्बी हंगामी, दुहंगामी तसेच हंगामातील इतर उभी पिके या पिकासाठी कालव्याचे प्रवाही/कालव्यातील उपसा, नदीनाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना नंबर 7, व 7(अ) 7(ब) मध्ये पाणी अर्ज सादर करावेत.

सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहित नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेवूनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाळी 25 नोव्हेंबर 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे. निम्न मानार प्रकल्प गोदावरी शाखा कालवा क्रं. 1, कालवा क्र. 2 व डावा कालवा, उजवा कालवा व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचनालयाच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी पाणी सोडण्यात येईल. रब्बी हंगाम सन 2023-24 मधील पाणीपाळीचा प्रस्तावित नियोजन पुढीलप्रमाणे आहे. आवर्तन क्र. 1 चा कालावधी 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 पर्यत आहे. आवर्तन क्र. 2 चा कालावधी 30 डिसेंबर ते 13 जानेवारी 2024 असून आवर्तन क्र. 3 चा कालावधी 29 जानेवारी 2024 ते 13 फेब्रुवारी 2024 असा प्रस्तावित आहे.

पाऊस व आकस्मिक कारणांमुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होवू शकतो. तरी प्रकल्प क्षेत्रातील सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता आ.शि. चौगुले यांनी केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!