फेस्कॉमचे अध्यक्ष अशोक तेरकर यांची सिडको येथील विरंगुळा केद्रांस सदिच्छा भेट
नवीन नांदेड। येथील स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरीक संघाच्या विरुंगुळा केंद्रास ज्येष्ठ नागरिक संघ मराठ वाडा प्रादेशिक उत्तर विभागाचे (फेस्काॅम)अध्यक्ष अशोक तेरकर यांनी सदिच्छा भेट दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अशोक तेरकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून फेस्कॉमचे सचिव जयवंतराव सोमवाड, डॉ.बी.जे.भांड, विश्वनाथराव शिंदे,डॉ.सायन्ना मठमवारसौ.भागीरथी बच्चेवार,श्रीमती महागावे आदी उपस्थित होते .ज्येष्ठ नागरिक संघ सिडको शाखेच्या वतीने पाहुण्यांचे शाल,श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.जेष्ठ नागरिकांना संबोधित करताना अशोक तेरकर हे असे म्हणाले.
”संघटन शक्ती हे महान शक्ती आहे, ज्येष्ठ नागरिक संघ एक कुटुंब आहे,एक परिवार आहे. ज्येष्ठांना सहकार्य करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. विरंगुळा केंद्र हे हक्काचे व्यासपीठ आहे. म्हणून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन या विरंगुळा केंद्राचा पुरेपूर उपयोग घ्यावा.ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आरोग्य शिबिरे व योग शिबिरे घेऊन आपल्या सर्वांचे जीवन निरामय व आनंदित करावेत”असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
याप्रसंगी डॉ.सायन्ना मठमवार,डॉ.बी.जे.भांड, जयवंतराव सोमवाड आदींचे भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भागीरथी बच्चेवार यांनी केले तर विरंगुळा केंद्र मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य केले त्यांचे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांनी विशेष आभार मानले. याप्रसंगी बहुसंख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.