ओबीसीच्या प्रश्नावर २ ऑक्टॉबर पासून आमरण उपोषण
नांदेड। ओबीसी आरक्षणास,घटनात्मक संरक्षण द्या,कंत्राटी नोकर भरती रद्द करा,महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत वाढ व दर महिन्याला शिष्यवृत्ती द्या.दत्तक शाळा योजना रद्द करा.खोटं जात प्रमाणपत्र काढणाऱ्या विरुद्ध कडक कार्यवाही करा.या मागणीसाठी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने सोमवार,२ ऑक्टॉबर पासून नांदेड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले स्मारक समोर सुरु आमरण उपोषण करण्यात येणार आहे. या आमरण उपोषणास माजी खासदार डॉ.व्यंकटेश काब्दे, ओबीसी नेत्या प्रा.सुशीला मोराळे,ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
शीतल भवरे,तरण्णूम महोम्मद बेगम,प्रियांका कदम,विनोद वाघमारे,कावेरी ढगे,संदीप थोरात यांनी अमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणास उस्मानाबाद येथील धनगर समाजाच्या नेत्या लता बंडगर ह्या पण नांदेड येथे आमरण उपोषण करणार आहेत.
आरक्षण हक्क संवर्धन समितीचे प्रदेश अध्यक्ष मा.पांडुरंग कवणे (पुसद,यवतमाळ) प्रदेश उपाध्यक्ष सोपानराव मारकवाड (नांदेड) प्रा.विलास भालेराव (लातूर) सरचिटणीस राजा रनवीर (अलिबाग, रायगड) संघटक श्याम निलंगेकर (नांदेड) यांनी या आमरण उपोषणाची राज्यव्यापी तयारी केली आहे.