कृषीनांदेड

पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याची गोमाता दगावली; नुकसान भरपाई देण्याची मागणी

हिमायतनगर,अनिल मादसवार| येथील अल्पभूधारक शेतकरी कैलास डांगे यांची गोमाता अचानक अस्वस्थ झाल्यामुळे पशुवैद्यकीय अधिकारी यांना उपचारासाठी बोलावून देखील येण्यास चालढकल केल्यामुळे अखेर गोमाता दगावली आहे. यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले असून, पशुधनाच्या उपचाराची सुविधा देण्यास चालढकल करणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करून कर्तव्यात कसून केल्याप्रकरणी उचलबांगडी करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी. आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुक्या जनावरांची उपचाराअभावी होणारी हेळसांड थांबवून योग्य उपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पशुधन विकास अधिकारी कार्यालयावर संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधात मोर्चा काढू असा इशारा भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी दिला आहे.

 

याबाबत सवसितर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्लीत राहणारे अल्पभूधारक शेतकरी कैलास डांगे यांच्याकडे ४ गाई आणि २ कालवडी आहेत. आपल्या कडे असलेल्या गोमातेची सेवा दररोज करून शेतीचे काम करणाऱ्या शेतकऱ्याची एक गाय आज दि.२१ रोजी सकाळी ८ वाजता अचानक अस्वस्थ झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याने हिमायतनगर येथील पशुधन विकास अधिकारी श्री उमेश सोनटक्के यांना संपर्क करून गोमातेच्या उपचार करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी लागलीच येतो… अर्धा तासात येतो.. येतच आहे असे करून तब्बल अडीच ते तीन तास उशिरा आले. त्यामुळे सदरील गाईने तडफडून आपले प्रमाण सोडले. हि घटना आज दुपारी ११ वाजता घडली असून, गाय दगावल्याच लक्षात येताच घरातील सदस्यप्रमाणे गाईला जोपासणाऱ्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रडू कोसळले आहे.

सकाळी गोमातेची प्रकृती बिकट झाली असल्याची माहिती युवा शेतकऱ्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांना देऊन देखील अधिकारी यांनी उपचारासाठी उशीर करत कर्तव्यात कसूर केल्यामुळे गोमाता दगावली आहे. केवळ पशुधन विकास अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे गोमाता दगावली असून, यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले आहे. सदरील नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यास दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यान केली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने पशुधनाच्या उपचारात चालढकल करणाऱ्या हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी करावी आणि गोरगरिब शेतकऱ्यांना उपचाराची सुविधा देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी येथून उचलबांगडी करून कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची हिमायतनगर येथे नेमणूक करावी अशी मागणी केली आहे.

जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुक्या जनावरांची उपचाराअभावी होणारी हेळसांड थांबेल आणि मुक्या जनावरांना योग्य वेळी योग्य उपचार सुविधा उपलब्ध होईल. अन्यथा शहरासह परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन पशुधन विकास अधिकारी यांच्या कार्यालयावर कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष लक्ष्मण डांगे यांनी पत्रकारांना बोलताना दिला आहे.

याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्याने हदगाव-हिमायतनगर मतदार संघाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून पशुधन विकास अधिकाऱ्याने गोमातेच्या उपचारासाठी टाळाटाळ केल्याची तक्रार केली आहे. एव्हडेच नाहीतर या अधिकाऱ्याची येथून उचलबांगडी करून शहरासह तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या गोवंश उपचारासाठी होणारी हेळसांड व पिळवणूक थांबविण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची मागणी केली आहे. याबाबत पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ असल्याचे मोबाईल कंपनीकडून सांगण्यात आले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!