उस्माननगर। येथील देशी दारू दुकानदार मालकांच्या शंभर रुपयांच्या शपथपत्र बाॅडवर ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेले गंगाधर कांबळे यांना लिहून दिलेल्या आश्वासनानंतर दि.३० मार्च रोजी सायंकाळी आमरण उपोषण दोन दुकान मालक आणि पोलिस अधिकारी व उपस्थित पंचांनी जुस पाजवून लांबत चालले आमरण उपोषण उठवण्यात यश मिळविले आहे.
उस्माननगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर कांबळे यांनी ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या एकमुखी ठरावाची प्रोसिंडिगच्या आधारावर येथील दोन्ही देशी दारूचे दुकान इतरत्र हलविण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली होती.की ,जर दोन्ही देशी दारूचे दुकान पंचवीस मार्च पर्येत इतरत्र हाटविले नाही. तर , दि.२७ मार्च २०२४ पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गंगाधर कांबळे यांनी २७ मार्च पासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती.
संबंधित दोन्ही दारू दुकानदार मालकांनी दि.३० मार्च रोजी सायंकाळी भेट देऊन शपथपत्रावर लिहून दिले की , आमच्या ( दोन्ही ) नावावर असलेले देशी दारूचे दुकान शासनाच्या नियमांच्या अधीन राहून जिल्हाधिकारी व अधीक्षक अतुल कानडे राज्य उत्पादन शुल्क यांनी आदेशीत केल्या नंतर सहा महिन्यांच्या आत इतरत्र हलवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करणार यामध्ये आमची काही शंका राहणार नाही. असे शपथपत्रावर राजीखुशीने पंचासमक्ष लिहून दिले आहे.यावेळी तुकाराम वारकड गुरूजी , जीवन पोचीराम सोनसळे , गंगाधर भिसे , माधवराव भिसे , शेषेराव काळम, केद्रे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जमादार भारती यांच्या सह दुकान मालक , नागरिक उपस्थित होते.