नांदेड| सुसंस्कार व चारित्र्यवान पिढी घडविण्यासाठी स्काऊट गाईड शिक्षण काळाची गरज असून त्याकरिता जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत बुलबुल व स्काऊट गाईड पथकांची नोंदणी करणे अनिवार्य आहे असे प्रतिपादन नांदेड भारत स्काऊट आणि गाईड संस्थेच्या कार्यकारिणी सभेत मार्गदर्शन करताना मा. शिक्षणाधिकारी प्राथ. तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. सौ. सविता बिरगे मॅडम यांनी केले.
नांदेड जिल्हा कार्यकारणी मंडळ सभा मा. शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ. सौ. सविता बिरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्यालय आयुक्त श्री. बंडू आमदूरकर, वेतन अधीक्षक प्रा. श्री. डी. जी. शेरकर, जिल्हा चिटणीस श्री. गंगाधर राठोड यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात स्काऊट गाईड प्रार्थनेने करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक जिल्हा संघटक श्रीमती शिवकाशी तांडे यांनी केले तर जिल्हा संघटक जनार्दन इरले यांनी स्काऊट गाईड चळवळी बाबत व जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती सभेत दिली. तसेच सभेचे विषय व वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी सभेत सर्व विषयावर उपस्थित मान्यवरांनी सखोल चर्चा करून सभेचे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
या बैठकीचे औचित्य साधून 7 नोव्हेंबर स्काऊट गाईड स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजदिनी स्टिकर्सचे विमोचन देखील करण्यात आले व या दिनाचे महत्व सर्वाना पटवून देण्यात आले.यावेळी सभेला मा. गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक जिल्हा आयुक्त श्री नागराज बनसोडे नांदेड श्री. बी. एम. पाटील बिलोली श्री. नंदकुमार कुलकर्णी उमरी श्री. एम. जी. वाघमारे भोकर श्री. डी. एम. नाईक देगलूर श्री. एस. एस. करेवाड केंद्रप्रमुख मुखेड तसेच जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती भागीरथी बच्चेवार, ए. एल. टी. गाईड श्रीमती ज्योती शिंदे तसेच जिल्हा कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक विशाल ईश्वरकर, कनिष्ठ लिपिक अनुराधा कोटपेट, शिपाई संजय गुडलावार उपस्थित होते. जिल्हा संघटक श्रीमती शिवकाशी तांडे यांनी सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले शेवटी सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.