हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोचार मोहिम (एमडीए) कार्यशाळा नांदेड येथे संपन्न
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात ( भोकर, हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, कंधार, नायगांव, बिलोली, देगलुर, मुखेड ) दि.१० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोचार मोहिम (एमडीए) राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी व जिल्हा पर्यवेक्षक यांची कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद नांदेड घेण्यात आली.
प्रशिक्षणाची माहिती डॉ आकाश देशमुख जिल्हा हिवताप व हत्तीरोग अधिकारी यांनी दिली. लातूर हिवताप विभागाचे सहाय्यक संचालक डॉ संजय ढगे यांनी एमडीए मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून वयोगटानुसार डिईसी व अल्बेंडाझाॅल गोळ्या समक्ष खाऊ घालून जनआंदोलन सारखे कार्य करावे असे सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेचे राज्य समन्वयक डॉ समाधान देबाजे यांनी हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोचार मोहिम विषयी विस्तृत माहिती दिली, मोहिम दरम्यान येणार्या अडि अडचणी, शंखेचे निरसन केले व चर्चा करून सोडविले.
हत्तीरोग रुग्ण यांचे सात टप्पे (प्रकार)चे फोटो लॅमिनेशन सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार यांनी संकलित करून तयार केलेले फोटो त्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे संतोष भोसले, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) कार्यालय लातूर येथील आरोग्य निरीक्षक सचिन कुलकर्णी, किटक समाहारक अखिल कुलकर्णी, पप्पू नाईक देसाई, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गणेश सातपुते, आरोग्य निरीक्षक माधव कोल्हे, अजित कोटूरवार, किटक समाहारक मनोहर खानसोळे, रविंद्र तेलंगे, शाम सावंत, भारत हाम्पले, गजानन अल्लापुरे आदि जिल्ह्य़ातील वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हा पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक हत्तीरोग आदि अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेस उपस्थित होते.