नांदेड। नांदेडचे भूमीपुत्र तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री राम अय्यर यांची भाजपा नांदेड जिल्हा महानगर किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जाते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्व दिवस म्हणजे दि 1 पासून राम अय्यर यांनी 50 वर्षांपूर्वी कंधार तालुक्यातुन समाज कार्याला सुरुवात केली होती. नांदेड जिल्ह्यात शेतकरी, कष्टकरी बाराबलुतेदारासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या संघर्षाचे आज फलित झाले आहे. भारतीय जनता पक्षाने एका परिपक्व नेत्यास नांदेड जिल्हा महानगर किसान मोर्च्या अध्यक्ष पदाची जिम्मेदारी देऊन शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं बळ दिलं आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव कंदकुर्ते यांनी श्री राम अय्यर यांची अचूक निवड केली आहें. त्यांच्या नेत्रतत्वात शेतकऱ्यांचे मजबूत संघटन उभे राहील असे मत कंधार भाजपचे नेते शंकरराव जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी श्रीराम अय्यर यांची भाजपा नांदेड जिल्हा महानगर किसान मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल श्री जाधव व श्री बेलकर गुरुजींनी समाधान व्यक्त करून त्यांचा सहृदय सत्कार केला.