हिमायतनगर रेल्वे स्टेशनचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते अभाशी पद्धतीने उद्घाटन संपन्न

हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाचा अमृत योजनेतून कायापालट करण्यासाठी नागरिकांच्या मागणीला अनुसरून खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा केल्यानं अमृत स्टेशन योजनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामावेश करून घेत मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे . आज दिनांक २६ सोमवारी हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा आभासी पद्धतीने उद्घाटन सोहळा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
हिंगोली लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या प्रश्नांसाठी नागरीकांच्या अपेक्षे प्रमाणे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी पाठपुरावा करून मागण्या पुर्ण करून घेण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. त्यातील काही मागण्या मंजुर झाल्या तर काही प्रस्तावित आहेत. त्यातील मुख्य मागणी म्हणजे हिमायतनगर येथील लोकांसाठी महत्वाचे असेलेले हे रेल्वे स्थानक “अमृत स्टेशन योजने” अंतर्गत जवळपास 11.353 कोटी रुपये खर्जून विकसित करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून, आधुनिक दर्शनी भागाचा विकास, प्रदक्षिणा क्षेत्रामध्ये सुधारणा, वाहतूक सुविधांचा मुक्त प्रवाह, वेटिंग हॉलमध्ये सुधारणा आणि प्रवासी अनुकूल संकेतांची तरतूद यासह दीर्घकालीन विकासाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. अमृत स्टेशन योजने अंतर्गत अपग्रेड योजनांच्या सौजन्याने पूर्ण विकासीत झाल्यावर हे रेल्वे स्थानक, शहराच्या सोंदर्यात भर पाडेल तसेच प्रवाशांना उच्च प्रतीचा अनुभव देण्यासाठी रेलवे सज्ज राहील.
देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतुन अमृत भारत योजनेत रेल्वे स्टेशनचा विकास पायाभुत सुविधांचा विकास करण्याची सुरूवात झाली आहे. मागच्या टप्प्यात किनवट येथे कार्यक्रम झाला या टप्प्यात ५५४ रेल्वे स्टेशन व १५०० स्टेशन रोड ओव्हर ब्रिज च्या कामासाठी ४१ हजार कोटी रूपयाच्या निधीचे उद्घाटन मा. पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पध्दतीने सर्व ठिकाणी एकाच वेळी झाले.
यात हिंगोली लोकसभेतील हिमायतनगर, किनवट, आंबाळा समावेश आहे. हि बाब विकासाच्या दृष्टिकोनातून खुप महत्त्वाची सर्वसामान्यांच्या हिताची आहे, अमृत योजनेत स्टेशन, ओव्हर ब्रिजचा समावेश व्हावा यासाठी खासदार पाटील सातत्याने प्रयत्न करत होते, ती मागणी पुर्ण झाली आहे. या कामाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवार दि २६ सोमवारी करण्यात आल. या कार्यक्रमाच आयोजन रेल्वे कडुन डिआरएम निती सरकार यांच्या माध्यमातुन करण्यात आल होत.
यावेळी खासदार हेमंत पाटील या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने त्यांचे जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांनी प्राप्त संदेश वाचून दाखविला यात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी, केंद्रीय रेल्वे दळणवळण इल्क्ट्रॉनिक्स आणि मीहिती तंत्रज्ञान मंत्री श्री अश्विनी वैश्नव, केंद्रिय रेल्वे कोळसा आणि खाण राज्यमंत्री मा. रावसाहेब पाटील दानवे , केंद्रिय रेल्वे वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, यांच्या सहकार्यामुळे भविष्यातील रेल्वे स्टेशनच बदलत रूप पाहता येणार आहे. त्यांच्यामुळे हिमायतनगर येथील रेल्वे स्टेशनचा कायापालट होत आहे असे नमूद केले होते. सदर कार्यक्रमाला पाटील स्वतः उपस्थित राहु शकले नाही. परंतु सर्वांचे खासदार हेमंत पाटील यांनी शुभेच्छा संदेशातून अभिनंदन केले.
या कार्यक्रमाला नायब तहसिलदार हराळे, मुख्याधिकारी रामचंद्र ताडेवाड, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महाविरसेठ श्रिश्रीमाळ, प्रतिष्ठीत व्यापारी गौतमसेठ पिंचा, भाजपाचे सरचिटणिस आशिष सकवान, नांदेड जिल्हा वैद्यकिय आघाडीचे प्रसाद डोंगरगावकर, भाजपाचे सरचिटणिस गजानन तुप्तेवार, भाजपा ता. अध्यक्ष गजानन चायल, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाकडुन ज्ञानेश्वर आधुडे, डॉ अंकुश सदावर्ते, डॉ सुचिता मैडम, भाजपा युवा मोर्चा मा. ता. अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, शहर प्रमुख गजानन हरडपकर, भाजपा शहराध्यष विपुल दंडेवाड, गणेशराव शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, प्रकाश कोमावार , मो.जाविद भाई, फेरोज खान, अन्वर खान, सदाशिवराव सातव, श्रिनिवास चिद्रावार, आदेश श्रिश्रीमाळ, कमलाकर दिक्तवार, प्रमोद तुप्तेवार, दुर्गेश मंडोजवार यांचेसह राष्ट्रसाधना पब्लिक स्कुल, राजाभगिरथ विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक, शहरातील नागरीक, पत्रकार, रेल्वेचे अधिकारी कर्मचारी बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
