नायगाव, रामप्रसाद चन्नावार| प्रहार दिव्यांग संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड यांनी दिव्यांग संघटनेच्या बैठकीचे आयोजन केले होते व त्या बैठकीत नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आर.एल.वाजे यांनी दिव्यांगंच्या 16 मागण्यांना सविस्तर उत्तरे दिली.
या बैठकीत नायगाव तालुका अध्यक्ष बोईनवाड व गटविकास अधिकारी वाजे सह दिव्यांग कक्ष प्रमुख उमेश कुमार धोटे, बाबु ढवळे दिव्यांग बचत गट प्रमुख नायगाव,प्रहार जनशक्ती पक्षाचे बिलोली तालुका अध्यक्ष शंकरदादा आचेवाड, मा.बालाजी रानवळकर, राजेश बेळगे, गोपिनाथ मुंडे, चांदू आंबटवाड कुंटूर,मिलींद कागडे,भगवान जाकापुरे,दिगंबर मुदखेडे,माधव शिंदे बरबडावाडीकर, मल्हारी महादाळे,सुधाकर जाधव,तिरूपती पुय्यड,बळीराम शिरसे, प्रकाश मुडपे,पिराबाई वाघमारे, जावेद चाऊस, एकनाथ संत्रे,दादाराव वाघमारे,व्यंकट नारे,अशोक कांबळे,मनिषा चुणचुणकर व अनेक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.