सरकारने विमुक्त जाती (अ) मधील अवैध घुसखोरी थांबवावी अन्यथा याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील – गोरसेना
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे दि.१३ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी गोर सेना व सकल विमुक्त जाती (अ) च्या वतिने येथील श्री परमेश्वर मंदिर प्रांगणासमोर महाराष्ट्र सरकार मधील शिंदे, फडवणीस, अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या प्रतिमाचे दहन करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनि सरकारचा जाहीर निषेध करत विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला दिले आहे.
गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपुर येथे हिवाळी अधिवेशाना दरम्यान विमुक्त जाती (अ) मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चामध्ये संपुर्ण महाराष्ट्र भरातुन हाजोरोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. गोर सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर ३.३० वाजेची वेळ दिली होती, परंतु ३.३० वाजता निवेदन कर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी सावे (बहुजन कल्याण मंत्री) विधिमंडळात हजर असतांनाही निवेदन स्विकारण्यासाठी वेळ दिला नाही.
आणि इतर कोणत्याही मंत्र्यांने सुध्दा वेळ दिला नाही हि बाब संपूर्ण महाराष्ट्रातील ५ कोटी विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील लोकांची हेतुपूर्वक दखल घेत नसल्याने हा प्रकार समाजाप्रती आसवेंदनशीलता दाखविणारा आहे. म्हणून या घटनेचा निषेध गोर सेना व सकल विमुक्त जाती (अ) च्या वतिने आज हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानासमोर करण्यात आला. यावेळी शिंदे, फडवणीस, अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आनंदोलन करून त्यांच्या प्रतिमाचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
मंत्र्याच्या या कृतीमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील ५ कोटी विमुक्त प्रवर्गातील लोकांच्या भावनेचा या संवेदनाहिन सरकारने भावनिक छळ केलेला आहे. संपुर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल ६२ विधानसभा मतदार संघात विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील लोकांच्या मतदानामुळे आमदार निवडुन येतात. परंतु हे आमदार आम्हां मतदाराची कुठल्याही प्रकारची दख्खल घेत नाहीत. म्हणुन येता २०२४ निवडुमुकीमध्ये या सगळ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवु असे आंदोलन कर्त्यांनी आपले विचार व्यक्त करतांनी म्हटले आहे. यावेळी अकाश जाधव, सुनिल चव्हाण, लखण जाधव, विशाल राठोड, विजय महाराज, विनोद जाधव, अतूल राठोड, शाम आडे, अंकुश चव्हाण, अंकुश जाधव, जगदीश जाधव, युवराज राठोड, रोहित राठोड, सूभाश चव्हाण,राजु राठोड, कृष्णा राठोड, बालाजी जाधव, मोनु आडे, विक्रम जाधव, अरविंद जाधव, पंडित राठोड, धरमसिंड आडे, विलास आडे, यासह अधिक समाज बांधव उपस्थित होते.
आंदोलनानंतर पुढील प्रमुख मागण्याचे निवेदन तहसीलदार डि. एन. गायकवाड यांच्या मार्फत शासणाला पाठविले. त्यात मांडलेल्या मागणी पुढील प्रमाणे :- १) विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभाथ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक (SIT) लागु करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समिती मध्ये वि.जा (अ) प्रवर्गातील एका तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणुन नेमणूक देण्यात यावी. २४ नोव्हेंबर २०१७ चा महाराष्ट्र शासनाकडुन निर्गमित झालेला रक्त नाते संबंधाचा निकस लावुन जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय (GR) व्वरित रद्द करण्यात यावा. संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुकानिहाय जिल्ह्याची यादी शासना मार्फत त्वरीत जाहीर करण्यात यावी. राज्य मागास अहवाल क्र.४१/२०१४ लागू करण्यात यावा. महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरीत रद्द करण्यात यावी. अश्या मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.