भोकर/नांदेड। क्रूरपणे चारही पाय बांधलेले आणि शिंगाला धरून वरती मुंडके करून वाहतूक करून 2 म्हशीच्या मृत्यूस आणि अनेक म्हशींच्या गंभीरतेला कारणीभूत ठरलेल्या कसायांनी उमरी कोर्टामध्ये मालमत्ता परत मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. माननीय न्यायालयाने सदर दावे फेटाळुन लावले होते. त्यानंतर कसायांनी सदरील आदेशास आव्हान देण्यासाठी शेषन कोर्ट भोकर येथे दावे दाखल केले येथेही मा. न्यायाधीश साहेबांनी कसायांचे म्हशीचे आणि वाहनांचे दावे फेटाळून लावले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि 01/02/2024 रोजी पोलीस स्टेशन उमरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाहन नंबर TS-16-UB-6896 आणि AP-07-TB-4911 मध्ये अतिशय क्रूरपणे चारही पाय बांधलेले आणि शिंगाला धरून वरती मुंडके करून गच्च बांधलेल्या अवस्थेत 39 म्हशी सदर 2 वाहनात आढळुन आल्या होत्या. त्यापैकी 2 म्हशी वाहनात गुदमरून दगावल्या होत्या आणि इतर 4-5 म्हशी अतिशय गंभीर स्थितीत आढळुन आल्या होत्या. सदर प्रकरणी गुन्हा दाखल होऊन त्या म्हशी हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील देवकृपा गोशाळेत उपचार आणि संगोपनासाठी पाठवल्या आहेत. त्यामुळे म्हशींची क्रूरतेने वागतुक करणाऱ्या कसायांनी उमरी कोर्टामध्ये मालमत्ता परत मिळण्यासाठी दावा दाखल केला होता.
माननीय न्यायालयाने सदर दावे फेटाळुन लावले होते. त्यानंतर कसायांनी उमरी न्यायालयाने दिलेल्या आदेशास आव्हान देण्यासाठी शेषन कोर्ट भोकर येथे दावे दाखल केले होते. भोकर कोर्टात देखील देवकृपा गोशाळा तथा गोविज्ञान केंद्रच्या वतीने ॲड जगदीशजी हाके साहेबांनी गोशाळेच्या वतीने भक्कमपणे बाजु मांडली. दोन्ही पक्षाची बाजु ऐकुन घेऊन मा. न्यायाधीश युसुफ खरादी साहेबांनी कसायांचे म्हशीचे आणि वाहनांचे दोन्ही अर्ज फेटाळुन लावले आहेत.
याविषयी बोलताना गोशाळेचे अध्यक्ष किरण बिच्चेवार यांनी मा. न्यायालयाचे, पोलीस दलाचे व या प्रकरणी विशेष मार्गदर्शन व सहकार्य करणारे मा श्री अशोक जैन साहेब, अध्यक्ष, प्राणी कल्याण संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानले आहेत.