हिमायतनगर, परमेश्वर काळे| शहरात यंदाचा शिवजयंती महोत्सव सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी समितीची निवड करण्यात आली असून, सार्वजनिक शिवजन्मोत्त्सव समितीच्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
आगामी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात श्री परमेश्वर मंदिर सभागृहात बैठक संपन्न झाली. या प्रसंगी उपस्थित डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी गेल्या २० वर्षांपासून शहरात निघत असलेल्या भव्य शिवजयंती संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. शहरातील सर्वधर्मियांना सोबत घेऊन दरवर्षी शिव जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यात व्याख्यान, पोवाडे, कीर्तन, अशा विविध माध्यमातून छत्रपती शिवयांचे विचार घरा घरात पोहचवण्याच काम समिती मार्फत केले जाते. त्याच माध्यमातून यावर्षी हा सोहळा मोठ्या हर्षोल्हासात साजरा होणार असल्याने सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीची निवड करण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती 2024 च्या अध्यक्षपदी अरविंद वानखेडे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर लिंगमपल्ले तर सचिव पदी नागेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यंदा शिवजयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे शोभायात्रेमध्ये शिवाजी महाराज यांची भव्य मूर्ती रहाणार असून, मोठ्या थाटा माटात वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढून साजरी करण्यात येणार आहे. असे नवनिर्वाचित अध्यक्षाने बैठकीत सांगितले. या बैठकीला सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे डॉक्टर राजेंद्र वानखेडे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील शिंदे, दत्ता सूर्यवंशी, गजानन पाळजकर, रामभाऊ सूर्यवंशी ,वामनराव मिराशे पाटील, श्रीकांत सूर्यवंशी, मोहन ठाकरे, लक्ष्मण डांगे, पापा शिंदे, मुन्ना शिंदे, गोविंद शिंदे, किरण माने, प्रतीक ठाकरे, शिवम गाजेवार , सोपान कोळीगीर, अजय माने, गजानन हरडपकर, प्रदीप नरहरे, विनायक पाळजकर, मंगेश शिंदे,आकाश वानखेडे, हनुमान अरेपल्लू , अक्षय जाधव, शुभम हरडपकर, विष्णू चव्हाण, दिपक मोरे, मंगेश धुमाळे, परमेश्वर नागेवाड , रवी चव्हाण, सीताराम शिंदे, कृष्णा कटारे, जयराम शिंदे, कृष्णा बोलसे ,विनायक ढोणे,अमोल कलाने आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.