नविन नांदेड। रुरल डेंटल महाविद्यालय पांगरी नांदेड व सनराइझ इंग्लिश मेडीयम स्कूल सिडको यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री. सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबीर दि.३ जानेवारी २४ रोजी उत्साहात संपन्न झाली.
सदरिल कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन डॉ.नानासाहेब जाधव हे होते तर व्यासपिठावर संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. शांतादेवी जाधव,प्रमूख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार,डॉ.प्रसाद जोहारे,डॉ.सुषमा बेलखेडे, यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची देवता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापिका सौ.राणीकौर कोचर यांनी सनराइझ इंग्लिश मेडियम स्कूल येथे चालत असलेल्या अनेक शैक्षणीक प्रगतीचा आलेख मांडला व भविष्यात सनराइझ इंग्लिश मेडियम स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांना कोण कोणत्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवन कर्यावर विस्तृतपणे अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला तसेच रुरल डेंटल महाविद्यालयाचे डॉ.प्रसाद जोहारे यांनी यांनी दंत रोगा विषयी विद्यार्थ्यांना अनेक प्रात्यक्षिके दाखवून सविस्तर माहिती सांगितली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलताना कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.आजच्या विद्यार्थ्यांनी नियमित शारीरिक कवायती व मैदानी खेळ खेळले पाहिजेत तरच बालकांचे आरोग्य सुदृढ राहील असे प्रतिपादन कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.शशिकांत हटकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय मुपडे,शिवराज सुरेवाड, सुशिल एडके,डॉ.राहुल सरोदे,राठोड ,कानवटे, सुषमा स्वामी, पुनम कांबळे,अनिता घोडके,स्नेहल स्वामी,सीमा बेबरे,उर्मिला मोरे,सविता हांडे,मंगला कानगुले,मनीषा दावनगिरे ,पुजा पोदार यांनी परिश्रम घेतले.या वेळी विद्यार्थ्यांबरोबर अनेक पालकांची मोफत दंतरोगत तपासणी करण्यात आली.सनराईझ इंग्लिश मेडीयम स्कूल येथिल सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.