नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तालुक्यातील मौजे हुस्सा येथील व्यंकट पाटील हंबर्डे यांनी यापूर्वीच्या मनसे मधील आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विज्ञान-तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभागाच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांना न्याय देण्याच्या अभिकेने काम करीत असलेली विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विभाग हे कार्यरत असल्याने मुंबई येथील टिळक भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विज्ञान तंत्रज्ञांचे राज्य अध्यक्ष सुरेश यादव, राज्य संघटक रेखाताई बनसोडे, मराठवाडा सरचिटणीस राजेंद्र रेड्डी टाकळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यंकट आनंदराव पाटील हंबर्डे यांची नांदेड जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले असून या सदर निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.