नांदेड। पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी दामिनी पेट्रोलींग करण्यासाठी दिलेल्या निर्देशानुसार ” महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव व त्यांच्या पथकातील हिन्ना अमलदार नलगोंडे ब.न. 2009, घागरे ब.न. 1096 व वाहन चालक गोरलावाड व.न. 2463 हे शासकीय वाहनाने दिनांक 17/11/2023 रोजी 18.00 ते 18.30 वाजताचे दरम्यान विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलींग करत असतांना एक 30 वर्षाची महिला आपल्या 05 वर्षाच्या मुलाला सोवत घेऊन विष्णुपूरी काळेश्वर मंदिराच्या पाटीमागील गोदावरी नदीच्या काटावरील पाय-यावर मुलाच्या हाताला धरुन नदीच्या दिसेने ओढत घेऊन जात होती व तो रडत होता.
मुलाच्या रडण्याचा आवामुळे दामीनी पथकच्या लक्षात सदर बाब आल्याने त्यानी त्या दिशेने लगेच धाव घेऊन आईला व मुलाला ताव्यात घेतले. व आस्थेवाईकपणे विश्वासात घेऊन विचारपुस केली असता सदर महिलेस एक 05 वर्षाचा मुलगा असून पती दारु व जुगाराच्या आहारी गेला असून तो रोज दारु पिऊन मारहाण करतो, नव-याचा व सासरच्या मंडळीकडून होणा-या सततच्या त्रासाला कंटाळुन नैरासेतुन मुलासह स्वतःला संपविण्याच्या विचाराने ती नदीकाठावर आली असल्याचे समजले.
सदर महिलेच्या नवरा व नातेवाईक यांना तात्काळ घटनास्थळी बोलावुन घेऊन तीची समजुत काढुन, तीचे समुपदेशन करुन तीला सुखरुप तीचे नातेवाईकांचे स्वाधिन केले आहे. यानंतरही काही अडचन आल्यास 112 वर कॉल करण्यास व कांही कौटुंबिक वाद असल्यास भरोसा सेल/ महिला सहायक कक्षाची मदत घेण्याबाबत कळविले आहे. महिला पोलीस उप निरीक्षक प्रियंका आघाव व त्याच्या पथकाचे मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार, यांनी कौतुक केले आहे.
काळेश्वर परिसरातील सुजान नागरीकांना पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात येते की, जर कोणी महिला, पुरुष काळेश्वर घाट परिसरात संशयरित्या फिरत असेल, त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो दुखःत असेल अशा वेळी लागलीच संबधीत पोलीस स्टेशनला कळविण्यात यावे जेणे करुन कांही वाईट घटना घडण्यापासुन पोलीसांना रोखता येईल.