यावर्षीपासून गोवर्धनघाट येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे जगावेगळा कायापालट उपक्रम सुरु

नांदेड। बालाजी मंदिर परिसरात तीन वर्ष जगावेगळा कायापालट उपक्रम यशस्वी केल्यानंतर चौथ्या वर्षापासून गोवर्धनघाट येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे रस्त्यावर फिरणाऱ्या ४० भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपयाचे बक्षीसी दिली असून या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गांधी जयंती निमित्त सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.
भाजपा ,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या विनंतीवरून गोवर्धनघाट परिसरात उपक्रम सुरू करण्यात आला. नवीन जागा असल्यामुळे अरुण काबरा,सुरेश शर्मा यांनी बालाजी मंदिर येथे जमा झालेल्या भ्रमिष्ठांना रिक्षातून गोवर्धन घाट ला आणले.कामाजी सरोदे, संजयकुमार गायकवाड,महेश शिंदे,शिवचरण लोट यांनी शहरातून फिरुन वेगवेगळ्या ठिकाणाहून भ्रमिष्ठांना दुचाकी वर घेऊन आले. स्वंयसेवक बालाजी खोडके यांनी सर्वांची कटिंग दाढी केली. स्नानासाठी स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती. कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता .सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.
डॉ.दि.बा.जोशी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केले.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर ॲड.चिरंजीलाल दागडीया यांच्या सह अनेकांनी परिसर झाडून स्वच्छ केला.सुरेश पळशीकर,कैलास महाराज वैष्णव यांनी सदिच्छा भेट दिली.यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी याची नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड दिलीप ठाकूर यांनी केले आहे. गेली ३ वर्षे अखंडीत पणे जगावेगळा कायापालट उपक्रम राबवित असल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
