नांदेडमहाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांसाठी आत्मविश्वासाने पुढे या – व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे

नांदेड| राज्यातील मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गोराडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाने बीज भांडवल योजना, अनुदान योजना सारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपला स्वयंरोजगार सुरू होईल, व्यवसाय सुरू करता येईल असा आत्मविश्वास व कौशल्य असलेल्या व्यक्तींना योजनेच्या अटी व निकषानुसार 45 टक्के बीज भांडवल योजना कार्यरत आहेत. अपेक्षीत लाभार्थ्यांनी यासाठी आत्मविश्वासाने पुढे येऊन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) अंतर्गत कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी केले.

आज 24 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन सभागृह येथे सकाळी 11 वा. आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. नांदेड व परभणी आणि हिंगोली येथील मांग व तत्सम जातीच्या बांधव या मेळाव्यास उपस्थित होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहोचविण्यासाठी योजनाचा प्रसार, प्रचारासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन व्यवस्थापक अनिल म्हस्के, प्रादेशिक व्यवस्थापक आर. जी. दरबस्तेवार हे उपस्थित होते.

महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेत बदल करुन देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठयाप्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती सांगळे यांनी दिली. देशाअंतर्गत शिक्षणासाठी 10 लाख तर परदेशात शिक्षणासाठी 30 लाख रुपये निकषानुसार दिलेल्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज शासनाने उपलब्ध केले आहे. एनएसएफडीसी योजना व त्यासाठी आवश्यक असलेली खंडहमी मिळणेसाठी शासन प्रयत्नशील आहे. सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजना प्रभावीपणे सुरु राहण्यासाठी 100 कोटी रुपयांची मागणी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्तीय विकास महामंडळ यांच्याकडे केल्याचे सांगळे यांनी सांगितले. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठया प्रमाणात घेण्याचे आवाहन महाव्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी केले.

व्यवस्थापकीय संचालक मनिष सांगळे यांनी महामंडळाचा पदभार स्विकारल्यापासून केलेल्या कामकाजाचा आढावा सादर केला. लाभार्थींनी योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड करताना, नवीन व नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडीबाबत मार्गदर्शन केले. महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे शासनाने महामंडळास उपलब्ध करुन दिलेल्या जमीन/जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या युपीएससी / एमपीएससी सेंटर व बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत मार्गदर्शन केले. महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक टी. आर. शिंदे यांनी महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. शिवा कांबळे, प्राध्यापक अमरजित आईलवाड, सामाजिक कार्यकर्ते लालबाजी घाटे, प्रकाश मुराळकर, (स्थायी) समिती सदस्य नामदेव कांबळे, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते रविकिरण वाघमारे,अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त श्रीमती हरीबाई कांबळे, रमेश गायकवाड यांचे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करुन महामंडळातील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना करण्यात आली. मनोगतामध्ये प्रामुख्याने जामिनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आली. महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक रमेश गायकवाड यांची त्यांच्या यशाबद्दल महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत आर.जी.दरबस्तेवार, प्रादेशिक व्यवस्थापक लातुर व टी.आर.शिंदे जिल्हा व्यवस्थापक नांदेड आणि आर. एन. पवार जिल्हा व्यवस्थापक परभणी, पी. जी. सुर्यवंशी लेखापाल हिंगोली आणि श्रीमती स्नेहलता अरुणराव खुणे लेखापाल नांदेड यांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर श्रीमान खानजोडे व रामराव मोहन कांबळे लोणकर यांनी गाणे सादर केली. प्रकल्प अधिकारी समतादुत बार्टी श्रीमती सुजाता पोहरे यांनी आभार मानले तर सुत्रसंचलन कु. विशाखा बंडेवार, विनोद पाचंगे समतादुत बार्टी यांनी केले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!