मुद्रांक शुल्क अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
3 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!
aaa

नांदेड| शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना 2023 लागू केलेली आहे. ही योजना 1 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 आणि 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 अशा दोन टप्प्यात लागू केलेली आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्याबाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपुर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागु करण्यात आली आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अशी असेल सुट व सवलत
1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीतील दस्तांसाठी
योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाख पर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपुर्ण माफी तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखावर असल्यास मुद्रांक शुल्कात 50 टक्के व दंडाची संपुर्ण माफी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये 80 टक्के सुट तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 1 लाखाच्यावर असल्यास मुद्रांक शुल्कात 40 टक्के व दंडामध्ये 70 टक्के माफी.

1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीतील दस्तांसाठी
योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी पर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 25 टक्के माफी व दंडाची रक्कम ही 25 लाखापेक्षा कमी असल्यास दंडामध्ये 90 टक्के माफी. तसेच दंडाची रक्कम 25 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 25 लाख रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रक्कमेला माफी. देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी पेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के माफी तसेच दंडात 1 लाख रक्कम स्विकारून दंडाच्या रक्कमेत सूट.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी पर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात 20 टक्के व दंडामध्ये 80 टक्के सूट. तसेच दंडाची रक्कम 50 लाखापेक्षा जास्त असल्यास केवळ 50 लाख रक्कम दंड म्हणुन स्विकारण्यात येऊन उर्वरित दंडाच्या रक्कमेत सुट. देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम 25 कोटी पेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात 10 टक्के माफी तसेच दंडात रुपये 2 कोटी रक्कम दंड म्हणून स्विकारण्यात येऊन उर्वरीत दंडाची रक्कमेची सुट देण्यात येणार आहे.

या अभय योजना 2023 चा लाभ घेण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नांदेड मार्फत ज्यांना मुद्रांक शुल्क भरणे कामी नोटीस प्राप्त झालेली आहे. ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, पोमंदे बिल्डींग पहिला मजला व्हीआयपी रोड नांदेड दूरध्वनी क्र. 02462-244424 या कार्यालयास सादर करावा आणि शासनामार्फत सुरु असलेल्या अभय योजनेअंतर्गत दंड सवलत योजनेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी वि. प्र. बोराळकर यांनी केले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!