धर्म-अध्यात्मनांदेड

नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात 27 व्या नवरात्र महोत्सवाची सुरुवात

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तिरुमला तिरुपती प्रति रूप समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या नरसी येथील भगवान बालाजी मंदिरात 27 व्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी स्वातंत्र्य सैनिक कै उद्योगपती उद्धवराव मेडेवार यांच्या प्रयत्नातून सुरु आहे.

तेलंगणा – महाराष्ट्र – कर्नाटक सीमेलगत हैद्राबाद महामार्गावर असलेल्या नरसी फाटा येथे सव्वीस वर्षांपूर्वी भव्य दिव्य अशी तिरुपती तिरुमला मंदिर ट्रस्टच्या वतीने दिलेली मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्याच मूर्तीचे 27 वा वार्षिक नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या निमित्ताने दिनांक 15 नोव्हेंबर रविवार ते 24 नोव्हेंबर मंगळवार पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने वेदशास्त्र पंडित ब्राह्मण यांच्या हस्ते पहाटे 5,30, ते 7,30, महाभिषेक 8,ते 11 वाहन मिवणुक, घटस्थापना ,गणेश पूजन ,अंकुर अर्पण ,कंकण बंधन ,होम हवन, पूजन, विष्णुसहस्त्रनाम, पुष्पा अर्चना, कुंकुम अर्चना ,तुलसी अर्चना , सहस्त्रदीप अलंकार, वसंत उत्सव ,कल्याण उत्सव, पालखी सेवा , वाहन सेवा मिरवणूक, नवरात्र विशेष 108 कलश महाअभिषेक पूजा , भाविक भक्ता कडून भगवान बालाजी मंदिरात अर्पण केले जाणारा महाप्रसाद दररोज विविध पदार्थाने गंगाळे दाखवण्यात येणार आहेत.

दहीभात, फुल हरा, केशर भात, चना ,शिरा ,पोंगल , विविध व्हेजीटेबल फळाने ड्रायफ्रूटने मिश्रित भात, वडा, बुंदी लाडू , दिनांक 15 नोव्हेंबर रोजी शेष वाहन ,16 नोव्हेंबर हंस वाहन ,17 नोव्हेंबर रोजी अश्व वाहन ,18 नोव्हेंबर रोजी सूर्यप्रभा वाहन १९ नोव्हेंबर हनुमंत वाहन, 23 नोव्हेंबर रोजी चंद्रप्रभा वाहन, दसऱ्याच्या दिवशी रथोत्सव, भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे दसरा महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी श्री भगवान बालाजी मंदिर ट्रस्टच्या वतीने नायगाव येथील उद्धवराव कॉम्प्लेक्स मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन बैठक घेण्यात आले.

या बैठकी प्रसंगी अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, श्रीराम मेडेवार, बाबुराव शक्करवार, संगमनाथ कवटीकवार, वसंतराव मेडेवार, भगवानराव लंगडापुरे, शंकर पाटील कल्याण, राजेश्वर मेडेवार,चंद्रकांत कवटीकवार, सदानंद मेडेवार, डॉक्टर पोलावार,सतीश मेडेवार, गजानन चौधरी ,नगरसेवक संजय पाटील चव्हाण ,पांडू पाटील चव्हाण ,विठ्ठल बेळगे, विठ्ठल सावकार लाभशेटवार, अतुल कवटीकवार, सतीश लोकमानवार, साईनाथ पण गादेवार.वट्टमवार, प्रदीप देमेवार, साईनाथ मेडेवार, हनमंत चव्हाण, यांच्यासह व्यापारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!