सिडको हडको भागात बुद्ध जयंती उत्साहात साजरी

नवीन नांदेड। अखिल मानव जातीला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनिय, महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म,ज्ञानप्राप्ती, नंतर महापरिनिर्वाण अशा तिन्ही महत्वपूर्ण घटना ज्या दिवशी घडल्या त्या वैशाख पौर्णिमेच्या निमित्त दिनांक २३ मे रोजी सिडको-हाडको परिसरातील सर्व बुद्ध विहारात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली,यावेळी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या सह समाज बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सिडको हाडको परिसरातील विविध बुद्ध विहारात वैशाख पौर्णिमेला भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करून उपस्थितांना खीर दान करण्यात आले. तत्पूर्वी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली.
सुभेदार रामजी आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्टआंबेडकर नगर वाघाळा येथील बुद्ध विहारात सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पत्रकार संभाजी सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आला या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष उपासक राघव वाघमारे हे होते यावेळी ट्रस्टचे भगवान जमदाडे, आनंदास सोनकांबळे, कबीर राक्षसे, रमेश गजभारे, अशोक धुळे, केशव जमदाडे, माधव वाघमारे, गौतम जमदाडे, भगवान सोनसाळे, विनोद वाघमारे, यशोधाबाई जमदाडे, माया सोनकांबळे, संगीता कांबळे, पारूबाई जोगदंड, विशाखा जमदाडे यांच्यासह उपासक व उपासिका यांची उपस्थिती होती.
पंचशील बुद्ध विहार हाडको येथेही पंचशील ध्वजारोहण डि.एम. कुंचेलीकर यांच्या हस्ते करण्यात आले.तत्पुरवी भगवान बुद्धांना पुष्प वाहून वंदना घेण्यात आली.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष पिराजी लोहकरे, भीमराव जमदाडे, सुभाष डोंगरे, संभाजी कांबळे, भंडारे शंकर, शामराव कांबळे, जोगदंड कांताबाई, वाघमारे जनाबाई, शोभाबाई जाधव इत्यादी उपासक-उपासिकांची उपस्थिती होती.
कुशिनारा बुद्ध विहार राहुल नगर वाघाळायेथेही बुद्ध विहार ट्रस्टचे मोतीराम गायकवाड, मारुती गायकवाड, राघोजी वाघमारे,गणेश जोंधळे, अर्चना गोधणे, लक्ष्मीबाई पैठणी,करुणा शिंदे, कुसुमबाई कांबळे यांच्यासह उपासक-उपासिका यांची उपस्थिती होती.माता रमाई बुद्ध विहार शाहूनगर येथेही बुद्ध जयंती साजरी करण्यात आली यावेळी डि.के.कांबळे, प्रदीप हनवते, गोविंद कांबळे,रामजी सोनकांबळे, माधव गायकवाड यांच्यासह उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.जेतवन बुद्ध विहार सिडको गुरुवार बाजार येथेही बुद्ध जयंती निमित्त भगवान बुद्ध यांची पुष्प पूजा करून वंदन घेण्यात आली.
यावेळी राजू लांडगे, विशाल जोंधळे, दिलीप लांडगे, राहुल वाडे,रवी थोरात,दीपक सूर्यवंशी,सिद्धोधन आठवले, चतुराबाई,सूर्यवंशीताई यांच्यासह परिसरातील उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.नागलोक बुद्ध विहार संभाजी चौक नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व बुद्ध जयंती निमित्त पंचशील ध्वजारोहण करून भगवान बुद्धांना पुष्प वाहुन वंदना घेण्यात आली. यावेळी विलास गजभारे, प्रसेनजीत वाघमारे,जनार्धन कांबळे, शुभांगी कांबळे, पंचशीला ताई भदरगे, प्रा.शशिकांत हटकर,नम्रता गजभारे, गंगाराम भालेराव,लाटकर रामजी इत्यादी यांची उपस्थिती होत.
दीक्षा बुद्ध विहार राहुल नगर सिडको येथे बुद्ध जयंती निमित्त बुद्ध वंदना घेऊन पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा.हटकर,भगवान जोगदंड,गणेश खंदारे यांच्यासह उपासक उपासिका बालक बालिका यांची उपस्थिती होती तर त्रिशरण बुद्ध विहार जयभवानी नगर सिडको येथेही पंचशील ध्वजारोहण करून भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदना घेण्यात आली.यावेळी राहुल सोनकांबळे, मारोती भाटकुळे,राहुल थोरात, प्रमोद टेलर यांच्या सह परिसरातील उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
