नवीन नांदेड। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड जिल्हा न्याय व विधी प्राधिकरण व महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम मराठवाडा प्रादेशिक विभाग उत्तर नांदेड यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक संघामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा भागिरथी बच्चेवार यांचा न्यायधिश श्रीमती दलजीत कौर जज सचिव न्याय व विधी प्राधिकरण व श्रीमती मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विविध उपक्रम राबवून ज्येष्ठांना सहकार्य करणे व ज्येष्ठ महिलांसाठी नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिर स्वच्छता अभियान अंध मुला मुलींचे वाढदिवस वृद्धाश्रमात भेट देऊन महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या.
17 सप्टेंबर मुक्ती संग्राम दिनानिमित्त इंदिरा गांधी हायस्कूल शाळेमध्ये गरीब व होतकरू व 17 सप्टेंबरला जन्मलेल्या मुला मुलींचा शैक्षणिक साहित्य देऊन वाढदिवस साजरे करणे यासह अनेक सामाजिक उपक्रम आयोजन केल्याबद्दल सामाजिक कार्याची नोंद घेऊन सत्कार करण्यात आला ,या वेळी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या सह डॉ. नंदकुमार मुलमुले ,याख्याते विजय देशमुख व निवृत्ती वडगावकर हे प्रमुख उपस्थित होते.
मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष अशोक तेरकर व मराठवाडा प्रादेशिक विभागाचे सचिव जयवंत सोमवाड, डॉ.निर्मला कोरे, सुनिता तेरकर, कमलबाई महागावे ,मंदाकिनी चिद्रावार सरस्वती होरे, किशनराव रावणगावकर, पद्मने ,विश्वनाथ शिंदे सायना मठमवार ,गरड, मुजरुद्दीन मामू, कदम पाटील, उपस्थित होते.