नांदेड। सायबर गुन्हेगार हे सर्व सामान्य जनतेची फसवणुक करण्याच्या उद्देशाने नवनविन मार्ग अवलंबित आहेत. त्यापैकी एक म्हणजे सायबर गुन्हेगार हे फेक इंटरनॅशनल (व्हच्युअल नंबर) वरुन कॉल करतात व आपले नाव घेवून आपणच बोलत आहात काय? याची खात्री करतात.
त्यानंतर आपल्या मुलाचे किंवा मुलीचे व नातेवाईकांचे नाव सांगतात व हे तुमचे कोण लागतात असे विचारतात आपण जवळचे नाते संबंध (मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील) सागीतल्यास ते कोठे आहेत असे विचारतात व आपण आपला मुलगा मुलगी (नातेवाईक) शाळा, कॉलेज, बाहेर गावी किंवा परराज्यात असल्याचे सांगीतल्यास “मै सायबर क्राईम डिपार्टमेंट से बात कर रहा हु, मै सिबीआई से बात कर रहा हु ” आपका बच्चा हमारे कब्जे मे है वो ड्रग्सके मामले मे पकडा गया, उसने यहा के मंत्री के लडकी को छेडा है, उसने यहा पे एक अक्सीडेंट कीया है आप तुरंत फोन पे, गुगल पे, क्युआर कोड, बँक अकाउंट नंबर पे पैसे ट्रान्सपर करो ” असे वेगवेगळ्या प्रकारचे कारण सांगुन आपल्याला लाखो रुपयाची मागणी करु शकतात. आपण आपले कुटुंबातील नातेवाईकांचा दुरचा संबंध (दुरका रिश्तेदार, जान पहचान वाला) असे सांगीतल्यास तात्काळ फोन कट करतात.
नांदेड जिल्हयातील नागरीकांना वरील प्रकारचा इंटरनॅशनल (व्हच्युअल) नंबर वरुन फोन कॉल, व्हॉटसअॅप कॉल आल्यास घाबरुन जावू नये, शक्यतो अशा प्रकारचे कॉल उचलू नये, कॉल उचलल्यानंतर आपला मुलगा मुलगीचे नाव घेतल्यास नाते सांगु नये व त्यांनी दिलेल्या फोन पे, गुगल पे, क्युआर कोड व बैंक अकाउंट नंबर वर पैसे पाठवू नये तसेच अशा प्रकारचा कॉल आल्यास जवळचे पोलीस स्टेशन तसेच सायबर पोलीस स्टेशन नांदेड येथे तात्काळ तक्रार दयावी असे अवाहन मा. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे.