
हिंगोली/नांदेड| गेल्या ५ दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात ऊमेदवारी बदलण्यावरून सुरु असलेल्या प्रकरणावर आज पडदा पडला आहे. हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागे घेऊन, नांदेडचे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. आज गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बाबूराव कदम कोहळीकरांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले तसेच भव्य रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, किनवटचे आमदार भीमराव केराम, नामदेव ससाणे, तानाजी मुटकुळे, शिवाजी माने, गजानन घुगे, तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली आहे.
उमेदवारी दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उन्हाचा कडाका सुरु आहे.. सूर्य आग ओकतो आहे… एवढ्या कडाक्याच्या उन्हात तुम्ही एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासाठी आलात. खरा म्हणजे बाबुराव यांच्या ध्यानामनात नव्हतं… बाळासाहेबांचे ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण सर्व सामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बनविण्याची ताकद फक्त बाळासाहेबांच्यातच होती. आणि बाळासाहेबांचे वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकांला मुख्यमंत्री करणार.. मुख्यमंत्री करणार.. पालखीत बसविणार.. असं म्हणत म्हणत स्वतःच जाऊन बसले. याच आम्हाला वावडं नाही. परंत्तू ज्या प्रमाणे शिवसैनिकांच खचीकरण होऊ लागलं.. बाळासाहेबांच्या विचारांचं खचीकरण होऊ लागलं… बाळासाहेबांची प्रखर भूमिका विचार याना जेंव्हा मूठमाती देऊ लागले. आणि मागील झालेल्या निवडणुकीत एकीकडे बाळासाहेब ठाकरे, दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मत मागणी केली. जो विश्वास मतदारांनी दाखवला आणि मग लग्न एकाबरोबर…. संसार दुसऱ्या बरोबर…यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा देऊन उबाठा गट काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला. हे आम्हाला सहन झाले नाही म्हणून स्व.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी या एकनाथ शिंदेंनी उठाव केला.
आज मी पाहतोय हा बाबुराव मागची हदगाव विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार झाला होता. त्यावेळी तिकीट देण्यासाठी मी प्रयत्न केला. मात्र तिकीट देणारे म्हणाले सर्वसामान्य माणूस आहे. तो कसा खर्च करणार… तो कसा प्रचार करणार.. त्याच्याजवळ किती पैसे आहेत… मी म्हणालो त्याची जबाबदारी मी घेतो काही काळजी करू नका… तरी त्यांच तिकीट कापल गेलं… आणि अधिकृत उमेदवारपेक्षा जास्तीची मते बाबूराव कदमानी घेऊन त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं. हा प्रश्न यावेळी देखील समोर आला.. मी म्हणालो बाबूराव शेतकऱ्याचा मुलगा आहे… एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. हा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा सर्वसमान्य कुटुंबातील आहे. मी म्हणालो…आता बाबुरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे खंबीरपणे उभा आहे.
मागचे मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारला असता पैसे किती खर्च करणार…आमचं काय… तुमचं काय…. असे सवाल केले असते.. हे माझ्याकडे काही चालत नाही माझ्याकडे एव्हढंच आहे.. जो चांगला कार्यकर्ता आहे.. त्याला पुढे आणायचं… बाळासाहेबांच्या विचारांची ही शिवसेना आहे. मोदींच्या राज्यामध्ये शिवसेनेच्या विचाराणे काम करणारी हि शिवसेना आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करणारी ही शिवसेना आहे. या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही मालक नाही. जो काम करेगा….वही राजा बनेगा…. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोटसुळ उठल. अजून त्यांना हजम होत नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा झाला हे त्यांना अजूनही हजम होत नाही. त्यामुळे त्यांना उठता बसता एकनाथ शिंदे…. एकनाथ शिंदे दिसतो. उद्या समोरचा एक शिवसैनिक मोठा झाला. कामाने मोठा झाला… कर्तृत्वाने मोठा झाला.. आणि मुख्यमंत्री म्हणून बोलायला लागला तर मला आनंद होईल असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या सभा आम्ही अश्या प्रकारे जमिनीवर बसून ऐकायचो आज बाळासाहेबांच्या विचारास तुम्ही तिलांजली द्यायला लागले तर बाळासाहेबांचा एकनाथ शिंदे सारखा शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून मी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना म्हणालो कि, यावेळेस आपण थोडा बदल करूयात.. सौ. राजश्रीताईला बाजूच्या मतदार संघातून निवडून अनुया… तुझ्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे त्याने तयारी दर्शविली आणि गोरगरीबांच्या सुखदुःखात धावून जाणारा बाबूराव कदम सारखा दुसरा उमेदवार नाही असे सुचविले. म्हणून हिंगोलीची उमेदवारी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बाबूराव कदमला देऊन थेट दिल्लीला पाठवायचं ठरवलं आहे. एकनाथ शिंदे काल देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होता…आज देखील कार्यकर्ता म्हणून काम करतोय… आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे.
मी काल परवा चार पाच तास बैठकांमध्ये व्यस्त होतो.. तर विरोधी म्हणूं लागले मुख्यमंत्री गायब झाले.. अरे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही…हा थेट जनतेत जाऊन मिसळणारा…त्यांच्याशी बोलणारा.. समजून घेणारा… दुःख समजून ऐकून घेणारा… आणि त्यावर उपाय करणारा मुख्यमंत्री आहे. बाबूराव बद्दल जर सांगायचं तर घर कि रोटी खायेंगे… और बाबूराव को चुनकर लायेंगे…अशी म्हणणारे कार्यकर्त त्यांच्यासोबत आहेत आणि हा एकनाथ शिंदे देखील त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. बाजूलाच असलेल्या वाशीम यवतमाळ आणि हिंगोली हे दोन्ही मतदार संघ जबरदस्त मतांनी जिंकायचं आहेत असेही ते म्हणाले.
तसेच बोलताना ते म्हणाले की, बाबूरावच नाव येऊ लागल तेंव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणू लागले अरे बाबा हे बाबूराव कसा कट होईल.. अरे बाबा कसा कट होईल …. इकडं आम्ही कट घेतच नाही… तर कसा कट होईल… ज्यांच आयुष्य गेलं कट… कमिशन मध्ये ते आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जे उबठा बसले त्यांच्याकडून काय..? आपेक्षा करणार. त्यांच्याकडे अजेंडा पण नाही आणि स्वतःचा झेंडा पण नाही. इकडे मोदी साहेबांचा अजेंडा काय आहे देशाचा विकास .. विकसित भारत हा अजेंडा आहे. आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र येऊन मोदीच काही बाल बाका करू शकत नाहीत. २०१४ ला पण हि चौकडी एकत्र आली होती… काय काय शिव्या दिल्या….. २०१९ ला पण हेच केलं… त्यामुळे विरोधी पक्ष नेता देखील बनू शकले नाहीत तेवढं पानिपत जनतेनं त्यांचं केलं.
मोदी साहेबानी जे देशासाठी केलं ते..मी पपरदेशात गेलो तेंव्हा पाहिलं यावर्षी ३ लक्ष ७३ हजार कोटीचे उद्योग आणले. देशाची एक नंबरला लोकप्रियता लाभलेले प्रधानमंत्रि आपल्या भारत देशाला लाभला.. हा आपल्याला गर्व आहे हा आपला अभिमान आहे. नंबर एक कुठे आणि यांचा नंबर कोठे गेला मला माहित नाही मी बोलू इच्छित नाही. जे वर्षातून चर्चा चार वेळा फिरायला जातात. दौरे करतात…थंड हवा खायला जातात. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी आत्तापर्यन्तच्या १० वर्षाच्या काळात एकही सुटी घेतली नाही, एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे कि.. परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा पाहिजे…? आपण हिंगोलीतून बाबूंराव कदम यांना उमेदवारी दिली, त्यांना मागच्या पेक्षाही अधिक लीडणे निवडून आणू असा विश्वास महायुतीचे सर्व मंत्री, आमदारांनी दिला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी एकच जल्लोष करत भव्य रैली नामनिर्देशन दाखल करण्यासाठी निघाली. हि अफाट गर्दी पाहून आजच बाबुराव कदम हे विजयी झाले अशी चर्चा परिसरात ऐकावयास मिळत होती. असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
