नांदेडमनोरंजन

श्रीराम भक्त मंडळ नांदेड आयोजित राम पहाट कार्यक्रमात राज्यभरातील तसेच नांदेडच्या कलावंतांनी भक्तीगिते सादर

नांदेड। रामनवमी निमित्त श्रीराम भक्त मंडळ नांदेड आयोजित आज सकाळी सहा वाजता कुसूम सभागृहात राम गितांची मंगलमय सुरमई प्रभात राम पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामाचे गुणगाण करणार्‍या रचना राज्यातील दिग्गज कलावंतांनी यात सादर केल्या.
कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती  अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांची होती. तर निर्मिती सहाय्य पत्रकार विजय जोशी यांचे होते. या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड यांचे विशेष सहकार्य लाभले. आज सकाळी सहा वाजता वेदशास्त्रसंपन्न मनोजगुरु पेठवडजकर व त्यांच्या शिष्य वृंदांनी वैदीक मंत्रघोष करत व श्रीरामाच्या मूर्तीचे पुजन करत कार्यक्रमाला प्रारंभ केला. तर कार्यक्रमाचे उद्घाटन व दिपप्रज्वलन शिवप्रसाद राठी, डॉ.सुशिल राठी, उद्योजक राजेंद्र हुरणे, भगिरथ राठी, डॉ.सुरेश दागडीया, अ‍ॅड.चिरंजीलाल दागडीया, सुधाकर टाक, अ‍ॅड.व्यंकटेश पाटनूरकर, रमेश सारडा, महेश चांडक, निलेश चांडक, नितीन माहेश्वरी, बापू दासरी, लक्ष्मीकांत बंडेवार, प्रणव मनूरवार, भागवत गंगमवार, उमेश रोडा, विश्वंभर लाभशेटवार, सुभाष बंग, डॉ.श्याम राठी, प्रख्यात गायिका रागिनी जोशी व गायक प्रसाद जोशी व महिला समितीच्या सदस्यांनी केले.
या कार्यक्रमात सई जोशी मुंबई, नितांशू सावंत मुंबई व सुप्रसिध्द गायक अशोक ठावरे नांदेड यांनी वेगवेगळ्या  प्रभू श्री रामचंद्राच्या रचना, अभंग व गाजलेल्या गितांची उत्कृष्ट मांडणी करुन छान सादरीकरण केले. त्यांच्या प्रत्येक गिताला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संगीतसाथ अनिल गोसावी मुंबई, ऋषिराज साळवी मुंबई, झंकार कानडे मुंबई, स्वप्नील धुळे, गौतम डावरे यांची होती.
नादातुनी नाद निर्मितो, उठी श्रीरामा, कौशल्येचा राम, आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, राम भजन कर मन, स्वयेश्री रामप्रभू ऐकती, राम जन्मला ग सखे, पायोजी मैने राम रतन धन पायो, राम का गुणगाण किजीये, आज अयोध्या सजली, स्वयंवर झाले सितेचे, रामचंद्र भजमन, दैव जात दुःखे भरता, सेतू बांधा रे सागरी, जग मे सुंदर है दो नाम, गा बाळा नो श्रीरामायण या गाजलेल्या रचना सादर करुन दिग्गज कलावंतांनी नांदेडकरांनी मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन प्रख्यात निवेदक अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले.  याच कार्यक्रमात नांदेडचे सुप्रसिध्द गायक तथा नांदेडभूषण संजय जोशी यांच्या गित रामायणाचे १५६१ कार्यक्रम पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा रामसेवा गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. सकाळची वेळ असताना देखील कुसूम सभागृह रसिक,प्रेक्षकांनी खचाखच भरले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी केले. तर आभार पत्रकार विजय जोशी यांनी मानले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!