प्रभू श्रीराम अवतारातील श्री परमेश्वर महाराजांच हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शन घ्यावं

हिमायतनगर,अनिल मादसवार। आज सर्वत्र मर्यादापुरुषोत्तम श्रीराम प्रभूचा जन्मोत्सव सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जातो आहे, त्याचं पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाढोणा येथील श्रीक्षेत्र परमेश्वर मंदिरातील श्री मूर्तीची विलोभनीय अशी डोळ्याचे पारणे फेडणारी सजावट करण्यात आली आहे.
रामनवमी निमित्ताने श्रीराम लल्लाचं दर्शन सर्वांना वाढोणा येथेच घडावं या उद्देशाने श्री परमेश्वर मूर्तीची श्रीराम स्वरूप अशी फुलांनी आकर्षक सजावट हिमायतनगर येथील शिवभक्त सुनंदा दासेवार, उषाताई देशपांडे, मुक्तताई बेदरकर, सुशीला बासेवाड, इंदूबाई शिखरे, नंदाबाई इंगळे यांनी दोन तास मेहनत घेऊन करून प्रभू श्रीराम लल्लाचं दर्शन घडवून आणले आहे, सकाळी 6 वाजता अभिषेक महापूजेनंतर जय श्री राम,, जय जय श्रीराम अश्या घोषणा देऊन श्रीराम स्वरूप परमेश्वराची आरती करून प्रसाद वितरित करण्यात आला आहे.
आजच्या दिवशी प्रभू श्रीराम अवतारातील श्री परमेश्वर महाराजांच हिमायतनगर शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी आवर्जुन दर्शन घेऊन पुण्य पदरी पाडून घ्यावं आणि दुपारी 3 वाजता शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणाऱ्या भव्य श्रीराम उत्सव मिरवणुकीत सहभागी व्हावे असं आवाहन श्री परमेश्वर मंदिर कमेटीतर्फे करण्यात आले आहे,
