सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत तिन करनिरक्षक नियुक्ती
नवीन नांदेड l नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सहाय्यक आयुक्त संभाजीराव कास्टेवाड यांनी तिन कर निरीक्षक यांच्या नियुक्तीचे आदेश दिले असून पाच वसुली लिपीक मागे एक निरीक्षक नियुक्ती करण्यात आली आहे.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांनी गेल्या अनेक दिवसापूर्वी बदल्या केल्या होत्या यात कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्या सह इतर अनेक कर्मचारी समावेश होतो, गेल्या अनेक दिवसांपासून कर निरीक्षक नियुक्ती नसल्याने कार्यालयीन कामासह ईतर अनेक कामासाठी दिरंगाई होत गेली.
अखेर १८ जुलै रोजी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी प्रभाग क्रमांक १९ व २० साठी प्रत्येकी पाच वसुली लिपीक मागे एक या प्रमाणे प्रकाश दर्शने, संजय नागापूरकर, मारोती सारंग, यांच्यी नियुक्ती केली असून तसे आदेश ही दिले आहेत. करनिरक्षक नियुक्ती नंतर मालमत्ता कर, पाणी कर यासह मालमत्ता धारक यांच्या कडील प्रलंबित कामे यांसह अनेक कामांना चालना मिळणार आहे