हिमायतनगर तालुक्यात पाणीटंचाई निवारणार्थ १९ लक्ष ४४ हजार रूपयांचा कृती आराखडा मंजूर
हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ माहे जानेवारी ते मार्च २०२४ , एप्रिल, ते जून २०२४ या कालावधीसाठी 19 लक्ष 44 हजार रुपयांचा ग्रामीण पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यानुसार उपाय योजना आवश्यकतेनुसार तात्काळ करून जनतेची पाण्यासाठी भटकंती होणार नाही याची काळजी घ्यावी अश्या सुचना वरिष्ठांकडून देण्यात आल्याची माहीती उप अभियंता सतीश हिरप यांनी दैनिक गावकरीशी बोलताना दिली आहे.
नांदेड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विकास आराखड्यानुसार हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावात नवीन विंधन विहीर घेणे यासाठी अपेक्षित खर्च प्रती गाव ९० हजार रूपये असून, या मध्ये वडगाव तांडा वडगाव अबादी, धानोरा ज., कार्ला पी., रमनवाडी, बोरगडी तांडा न. २ , कांडली खू, विरसनी २, पिंपरी, दुधड, वाळकेवाडी, वाळकेवाडी २, रामबापू नगर, वडाची वाडी, पार्डी ज , खैरगाव ज, लाईनतांडा, बोधनतांडा, एकंबा, पवना २, पवनातांडा, दस्तगीरवाडी, पावनमारी, पारवा खू, सवना ज, महादापूर, सिरंजनी, टेंभी, पारवा बु., फूलसिंग तांडा, मंगरूळ, वाई, वाईतांडा, सोनारी, खडकी बा २, घारापूर, सिरपल्ली, सेल्लोडा, दिघी, कामारी, डोल्हारी गणेशवाडी, टाकराळा बु, वडगाव खू, मानसिंग तांडा, मानसिंग तांडा२,वारंगटाकळी, अंदेगाव, अंदेगाव पुर्व, अंदेगाव पश्चिम, बोरगाव ता, कामारवाडी, कौठावाडी, कौठा तांडा, पळसपूर, पोटा बु-२,वाशी, एकघरी, बळीराम तांडा, आदी गावांचा समावेश आहे.
तसेच विंधन विहीर विशेष दुरूस्ती साठी अपेक्षित खर्च २० हजार यामध्ये वडगाव ज, वडगाव तांडा, वडगाव अबादी, धानोरा ज, कार्ला पी, पिछोंडी जवळगाव, स्टेशन अबादी, एकघरी, रमनवाडी, बोरगडी, बोरगडी तांडा न. १, २, कांडली खू., विरसनी, पिंपरी, दुधड, वाळकेवाडी, रामबापू नगर, वडाची वाडी,पार्डी ज, दरेसरसम, करंजी, चिंचोर्डी, दगडवाडी, खैरगाव ज, लाईनतांडा, बोधनतांडा, एकंबा, पवना, पवनातांडा, दस्तगीरवाडी, टेंभूर्णी, पावनमारी, पारवा खू, सवना ज. महादापूर, सिरंजनी, टेंभी, शिबदरा ज, सरसम बु, इंद्रनगर, कोतलवाडी व तांडा, पारवा बु, मोरगाव, कांडली बु., कोकातांडा, फूलसिंग तांडा, बळीराम तांडा, मंगरूळ, वाई, वाईतांडा, सोनारी, खडकी बा, घारापूर, सिरपल्ली, सिल्लोडा, वाघी, किरमगाव, दिघी, कामारी, डोल्हारी, जिरोना, जिरोना तांडा, गणेशवाडी, दरेगाव दरेगाव तांडा, टाकराळा बु, वडगाव खू, मानसिंग तांडा, मानसिंग तांडा २ , वारंगटाकळी, अंदेगाव पुर्व अंदेगाव पश्चिम, बोरगाव ता, दाबदरी, भोडणीतांडा, काळूनाईक तांडा, कामारवाडी, कौठा ज, कौठावाडी, कौठातांडा, पळसपूर, खैरगाव ता, पोटा खू, पोटा बु, पोटा तांडा, वाशी, वटफळी, बळीराम तांडा, या गावाचा समावेश आहे.
विहीर अधिग्रहण करणे यासाठी अपेक्षित खर्च प्रती गाव ५४ हजार रूपये तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पिछोंडी, बोरगडी, दुधड, वाळकेवाडी, पारडी ज, दगडवाडी, खैरगाव ज, बोधनतांडा, टेंभूर्णी, पावनमारी, महादापूर, टेंभी, सरसम बु, इंदिरानगर, फूलसिंग तांडा, बळीराम तांडा, मंगरूळ, सोनारी, घारापूर, सिरपल्ली, शेल्लोडा, गणेश वाडी, टाकराळा बु, मानसिंग तांडा, वारंगटाकळी, भोडणीतांडा, काळूनाईक तांडा, कामारवाडी, कौठा ज, कौठावाडी, कौठा तांडा, खैरगाव ता, पोटातांडा, वाशी, बळीराम तांडा आदि गावांचा समावेश असून, या करीता १९ लक्ष ४४ हजार रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली असून माहे मार्च २०२४ ते माहे एप्रिल ते जून महिन्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाई निवारणासाठी हा खर्च करण्यात येणार आहे. अशी माहीती पाणी पुरवठ्याचे अभियंता सतीश हिरप यांनी दिली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात टंचाई आराखड्याच्या नावाखाली शासनाकडून निधी मिळत आहे, तरी देखील प्रशकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे दरवर्षी हिमायतनगर तालुक्यात टंचाई निर्माण होते आहे. टंचाईच्या नावाखाली लाखोंचा मंजूर होणारा निधी जातोय कुठे..? असा सवाल हंडाभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकाकडून विचारला जात आहे.