
नांदेड। सामाजिक बांधिलकीतून लोकसेवा घडावी या उद्देशाने पूजा हेल्थकेअर सेंटर सिडको चे संचालक सुझोक , आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. संभाजी पवार यांच्या माध्यमातून दि. 22 नोव्हेंबर 2023 रोज रविवारी अन्नपूर्णा माता मंदिर वडेपुरी येथे स.10 ते 5 या वेळेत गुडघे दुःखी, कंबर दुखी, मान दुःखी, या आजारावर मोफत अकुप्रेसर सुजोकं उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नेहमीच समाज सेवा, रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा मानणारे , गेली आठ वर्षे हजोरो रुग्णावर अकुप्रेसर सुजोक् आयुर्वेदा च्या माध्यमातून उपचार करणारे डॉ. संभाजी अवधुतराव पवार यांनी नवरात्री महोत्सवा निमित्याने वडेपुरी ता. लोहा जी. नांदेड येथील अन्नपूर्णा माता मंदिर येथे दि. 22 नोव्हेंबर रोज रविवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजे पर्यंत वात विकार गुडघे दुःखी, कंबर दुखी, मान दुःखी यावर सूजोकं अकुप्रेसर मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी संयोजकां तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
