नांदेडलाईफस्टाईल

जाचक वाढीव पाणीकर, अकृषिक कर रद्द करा; नागरिकांचे महानगरपालिकेपुढे धरणे आंदोलन

नांदेड| नांदेड वाघाळा महानगरपालिका अंतर्गत येणार्‍या प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांनी आज सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे व सोपान मारकवांड यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेपुढे जाचक पाणी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.

महानगरपालिकेने २०२२ २३ या आर्थिक वर्षात पिण्याचे पाणी करात दुपटीने वाढ करून नांदेड महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग मनमानी जीजिया कराप्रमाणे नांदेड शहरातील मालमत्ता धारक जनतेला कोणत्याही प्रकारच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधा न पुरविता दुपटीने पाणी कर वसूल करून नागरिकांची आर्थिक लूट करीत आहे. शहराला दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जातो परंतु महानगरपालिकेने पाणी करात दुप्पटीने वाढ केली आहे.

जाचक पाणी कर तात्काळ रद्द करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे यांच्या नेतृत्वात आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. जाचक पाणी कराबरोबरच महानगरपालिकेने नांदेड महानगरपालिका अंतर्गत येणार्‍या सर्वच नगरांचा एनए अकृषिक कर रद्द करावा अशी मागणी केली आहे. सन १९७१ साली मंजूर झालेला असून हा भाग पूर्वीच्या नसरतपूर ग्रामपंचायत च्या गावठाण भागामध्ये मोडतो. या जागेचा वापर फक्त घरगुती निवासासाठी केला जातो तरी महानगरपालिका सन १९९७ पासून प्रभाग क्रमांक चार मधील मालमत्ता धारकाकडून जबरदस्तीने अकृषिक कराच्या नावाखाली नागरिकांकडून जबरी रक्कम वसूल केली जात आहे. तात्काळ हा जाचक अकृषिक कर रद्द करावा. अशी मागणीही निवेदनकर्त्यांनी केली आहे.

मलनिस्सारण व्यवस्था संपूर्ण ढासाळून पाईप जुनाट झाल्यामुळे या भागात दुर्गंधी पसरत आहे. सांडपाण्याचे पाणी व तसेच शौचालयाचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे या भागात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. तात्काळ महानगरपालिकेने ही ड्रेनेज लाईन सुधारावी व मलनिस्सारण कर रद्द करावा. अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रभागातील आनंदनगर चौक ते विको वाईन मार्ट पर्यंतच्या रस्त्याचे सहा महिन्यापासून रखडलेले काम सुरू करावे, या भागातील विजेच्या दिव्यांची तात्काळ व्यवस्था करावी, अदी अत्यावश्यक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक कसबे सोपानराव मारकवाड बालाजी सौदागर तुकाराम पाटील, शेख चांद पाशा, ओमप्रकाश रघुपती,शेख युसुफ, एस एस ढगे, सोपान वाघमारे, मारोती भोळे,सुखदेव मूनेश्वर,अजिज पठाण, नामदेव इंगळे, आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव श्याम कांबळे, कम्यूनिष्ठ पक्षाचे डॉ. के.के.जामकर, कॉम. विजय गाभने, डॉ. डी. येन घायाळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!