वेळीच दक्षता बाळगल्यास व होमिओपॅथी औषधाची एक मात्रा घेतल्यास जिवघेणा उष्माघात सहज टाळता येतो! घाबरण्याचे कांहिच कारण नाही डाॅ.हंसराज वैद्य
नांदेड| सद्याला नांदेडचे कमाल तपमान गेल्या 3-4 दिवसा पासून 43 -44 अंश सेल्शीयस पेक्षाहि जास्तच असल्याचे जानवत आहे.अर्थात उष्णतेची लाट सद्रश्य परिस्थिती आहे.प्रचंड तथा प्रखर तपमान आहे.सूर्य देव आग ओकत आहेत. रोजच्या रोज तपमान वाढतच आहे.कमाल तपमानापेक्षा 4-5 अंश सेल्सियस ने तपमानाची पातळी ओलांडली व ती पातळी 3 दिवस कायम तसीच राहिली तर त्या स्थितीस आपण “उष्णतेची लाट” असल्याचे मानतो .कमाल तपमानापेक्षा 5-6 डिग्री सेल्सियस पर्यंत तपमान गेल्यास तथा वाढल्यास,पाणी कमी पिण्यात आल्यास, घरात बसूनहि उष्मापात (शरिरातील पाण्याची पातळी कमी होणें, निर्जलीकरण होणें,शुष्कता तथा शरिरात पाण्याची कमतरता स्थिती येणें)आणि प्रखर सूर्य किरणात प्रत्याक्षात गेल्यास किंवा काही क्षणहि काम केल्यास “हीटस्ट्रोक”, “सनस्ट्रोक” अर्थात “उष्मा घात”क्षम स्थिती केव्हाहि बणू शकते! !.
.
“हीट स्ट्रोक”,”सन स्ट्रोक” तथा “उष्माघात” हा एक प्रकारचा जिव घेणा “अपघातच” आहे. अवस्था आहे.क्रिकेटच्या खेळात जसा बॅटस् मन डोळ्याची पापणी पडण्याच्या वेळे इतक्या क्षणार्धाच्या वेळेत क्रिकेट बाॅलला, बॅट ने बाॅर्डरच्या बाहेर घालवतो किंवा भिर्कावतो, तितका आवकाश उन्हाचा “झप्का”,/ “तडाखा”,/”झटका”,/ “चट्का”/तथा “फटका” बसण्यास पुरे आहे! म्हणूनच त्याला”हीट स्ट्रोक”, “सन स्ट्रोक”,”उन्हाचा फटका” तथा मराठी ढोबळ भाषेत त्याला “उन्हाचा चटका तथा झप्का” बसला असे म्हटल्या जाते.संबोधिले जाते! “हीट एक्झाॅशन”तथा “उष्मापात” (शरिरातील पाण्याची पातळी कमी होणें, नर्जलीकरण होणें तथा शरिरात पाण्याचे प्रमाण कमी) होण्यासाठी या प्रखर उन्हाळ्याच्या दिवसात साधे पुरेसे पाणी न पिल्याने व क्षणिक उन्हात फेर फटका मारल्याने सुध्दा होते!कारण या प्रखर उन्हाच्या झोताने अंगातील पाण्याचे सतत अदृश्य बाष्पीभवन होत असते! म्हणून सतत थोड्या थैड्या वेळाने साधे का होईना पाणी पित राहिल्याने संभाव्य धोका टळू शकतो!
.
“हीटस्ट्रोक”,”सनस्ट्रोक” अर्थात “उष्माघात” होण्या साठी फार वेळ किंवा काळ तळपत्या उन्हात तथा उष्णता निर्माण करणार्या यंत्राच्या सानिध्यात काम करायलाच हवे असे नाही! काही अवस्थेत, काही क्षणाच्या प्रखर सूर्य किरणाच्या किवा उष्णतेच्या ठिकानच्या काही काळच्या संपर्काने सुद्धा भयाह स्थिती उद्भऊ शकते! . म्हणून भिऊही नका,घाबरून जाऊही नका , पण वेळीच दक्षता मात्र जरूर घ्या! विणा कारण तथा टाळता येत असूनही घरा बाहेर जाऊ नका!घरा बाहेर जाणे टाळाच! तहान नसतानाही सतत पाणी पित रहा एवढेच!
.
आणि घरा बाहेर उन्हात जाणे अत्यावश्यकच असेल तर, घराबाहेर पडण्या अगोदर एक ग्लासभर थंड,नसेल तर साधे का होईना पाणी प्या,पातळ पदार्थ, साखर मिठ लिंबू पाणी,तथा ताक मिठ साखर लिंबू पाणी,कांदा तथा तत्सम पाणी क्षार युक्त फळं टरबूज-खरबूज घ्या.अनवाणी न जाता पायात वहान घाला,अंगावर पातळ,ढिले तथा शैल सुती शूभ्र पांढरे कपडे परिधान करा. डोक्यावर पागोटे,मुंडासे, टोपी,शक्य झाल्यास हॅट(उत्तम), उपरने, गम्च्या,ओढणी तथा अंग भरून कपडे ,भरून पदर आणि जमल्यास उन्हाळी चष्मा(गाॅगल) परिधान करा . सावली सावलीने थांबत थांबत प्रवास करा.पोहचल्या नंतर थोड्या वेळाने पुन्हा एक ग्लास भर साधे का होईना सावकाश पाणी प्या व खुल्या जागेत कामास लागा!
.
लहान अर्भकाचे केवळ उष्ण तथा तप्त हवेच्या झोताने सुद्धा शरिराचे तपमान वाढते. अदृश्य बाष्पीभवनाने अर्भकाच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कमी होते व ताप येते.त्यास “अनॅननिशन फिवर”अर्थात “शुष्कता ताप” असे संबोधले जाते.कारण त्यांच्या “मेंदूतील तपमान नियंत्रण केंद्र” तितके अजून विकसीत तथा परिपक्व झालेले नसते .घाबरून जाऊ नका.उष्ण हवामाना पासून त्यास दूर ठेवा व तज्ञाचा त्वरित सल्ला घ्या! एक ते सहा वर्ष वयातील बालके,गरोदर माता,मधूमेही,रक्त दाब तथा जीर्ण आजाराने पिडित असणारे रूग्ण,व्यसनाधिन व्यक्ती आणि साठ वर्षा वरील सर्वच ज्येष्ठ नागरिक “उष्मापात(हीट एक्झाॅशन)”आणि “हीटस्ट्रोक”, “सनस्ट्रोक” तथा “उष्माघात प्रवण” असतात.
.
त्यामुळे त्यांनां विशेष जपले पाहिजे!त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.त्यांनां सकाळी आठ साडे आठ ते संध्याकाळी पाच पर्यंत घराबाहेर जाण्यास मज्जावच करायला हवे! उष्णतेचा उपद्रव तथा प्रादुर्भाव टाळण्या साठी सर्वांनींच कामाचे वेळा पत्रक जाणीवपूर्वक बदलणें गरजेचे आहे.कार्यालयीन वेळा पत्रकही बदलायला हवे. कार्यालयात शुद्ध तंड पाण्याची व्यवस्था असावी.शाळांना सुट्या द्याव्यात तथा वेळापत्रक बदलणें उत्तम. सकाळी आठ साडे आठच्या आत व संध्याकाळी पाच साडे पाच नंतर कार्यालयीन वेळा पत्रक ठरविणें गरजेचे आहे.
.
वरिल प्रतिबंधात्मक उपाया बरोबरच नांदेड येथील वजिराबाद चौकात, जिल्हा पोलिस मुख्यालया समोर, वैद्य रुग्णालयात सर्व अबाल वृद्ध ज्येष्ठ नागरिक तथा लाभार्थ्यांनी “विना शुल्क” तथा “विना मुल्य” उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधी मात्राचा लाभ घ्यावा . दिवसभर व रोजच ही औषधी मात्रा वैद्य रूग्णालयात देण्यात येत आहे.सर्वच जनतेने याचा रोज उन्हाच्या आधी सकाळी व संद्याकाळी पाचच्या नंतर लाभ घ्यावा !